Monday, August 4, 2014

Sanskrit Day 2014

ऑगस्ट १० २०१४ रोजी श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण पौर्णिमा हा दिवस संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संस्कृत दिन संपन्न करताना केवल औपचारिकता म्हणून नव्हे तर उत्साहाने आणि आधुनिकतेशी  समन्वय साधून आपण साजरा करायला हवा. संस्कृत ही ज्ञान भाषा आहे।  अपरम्पार विद्येचा स्रोत संस्कृत आहे. साहित्य ते तत्त्वज्ञान आणि व्याकरण ते आरोग्य विज्ञान या विषयी प्रगल्भ प्रचंड आणि विश्लेषणात्मक असा माहितीचा साठा संस्कृतात आहे.
                 या सर्व बाबींचा उहापोह आणि चर्चा सर्वत्र घडवून आणण्यासाठी संस्कृत दिन ही एक संधि आहे. संस्कृत मधील संशोधनाच्या संधि या दिवशी आपण उलगडून  दर्शवू शकतो. हा दिन केवल संस्कृतची महती सांगणारा नको तर संस्कृतची माहिती सांगणारा सिद्ध करू या.
                 लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संस्कृतचा अनुबंध आहे. भाषा भजन भोजन परिवेष या सर्वच बाबतीत त्याची उपस्थिति भारत वर्षात जाणवते . संस्कृत वाङ्ग्मयाची ही यथार्तता आहे.
                यासाठी अभ्यासकानी  बाळगता भविष्याचा वेध घेऊन संस्कृतात समकालीन विषयाला अनुलक्षून संस्कृतात नव साहित्य निर्मिति करणे विवक्षित आहे. हा विचार करून आगामी नवीन ब्लॉग सादर करणार आहे. यात अनेकविध विषयाना स्पर्श करणाऱ्या स्वरचित संस्कृत रचना असतील . आपण स्वागत करालच।  तावत् जय श्रीकृष्ण। ।
चन्द्रहास:!

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...