Tuesday, March 31, 2015

Dr. Chandrhas Shastri writes on fearlessness.

तत्र स्थितं निर्भयत्वम्  
विचारो यत्र वर्तते।
सभयत्वं तु सर्वत्र
विकारोत्पादितं ननु॥

जेथे विचार तेथे निर्भयता. जेथे विकार तेथे भय.

चिन्ताशोकौ विकारौ तौ
प्रायो हि व्यर्थकारणात्।
न जानाति भविष्यं च
न भूतः परिवर्तते॥

चिंता व शोक हे दोन विकार बहुधा व्यर्थ कारणाने असतात. भविष्त जाणत नाही आणि भूतकाल बदलत नाही.

मास्तां तयोर्भयं शोको
वर्तमाने हि जीवतु।
त्यक्त्वा भयं च शोकं च
मोदं यच्छेत् जनाय वै॥

म्हणून भविष्य व भूतकालाचे भय व शोक असू नये. भय व शोक त्यागून लोकाना आनंद द्यावा.

Sunday, March 29, 2015

Dr. Chandrhas writes on the basic features of foolish person.

॥मूर्खलक्षणम्॥

प्रीतिर्विनाशहेतौ
कोपो विकाससाधने।
प्रथमं लक्षणं ज्ञेयं
मूर्खस्य भूतले सदा॥

विनाशाच्या साधनावर प्रेम आणि विकासाच्या साधनावर राग हे या भूतलावर मुर्खाचे प्रथम लक्षण जाणावे.

नैवानुक्रीयते वाक्यं
यदुक्तं सज्जनेन हि।
तद्विपरीतमाचारं
मन्यते लाभकारणम्॥

जे सज्जनाने सांगीतलेले वाक्य आहे, त्याचे मुर्खाकडून अनुकरण केले जात नाही. त्याच्या ऊलट आचरणास मात्र लाभाचे कारण समजले जाते.

प्रलापजल्पनशापै
र्युक्तं प्रभाषणं तथा।
कृतिशून्यं प्रभाहीनं
मूर्खभाषणलक्षणम्॥

प्रलाप, बडबड, शाप यांनी युक्त तसेच कृतिशून्य व तेजहीन ही मुर्खाच्या बोलण्याची लक्षणे असतात.

Tuesday, March 24, 2015

Dr. Chandrhas writes on a status of thoughts in mind.

अविचारसमो दैत्यो
सद्विचारसमो सुरः।
यत्र वासस्तयोः स्थानं
मन इत्यभिधीयते॥
अविचाररूपी दैत्य व सद्विचाररूपी देव या दोहोंचा निवास जेथे संभवतो त्यास मन असे म्हणतात.

दैत्यारिं नाशयित्वा हि
प्राप्तव्या देवमित्रता।
किं वा नश्यति दैत्यारि
र्देवप्रकटने स्वयम्॥
शत्रु अशा दैत्याचा म्हणजे अविचाराचा नाश करून देवमित्रता म्हणजे सद्विचारांचे साहचर्य प्राप्त करावे अथवा देव म्हणजे सद्विचार प्रकट झाल्यावर दैत्यारि म्हणजे दुर्विचार स्वयमेव नष्ट होतो.

तस्माद्ध्येयं त्वया नाम
सुरस्य परमं सदा।
यद् परिकल्पते नाम्ना
चित्तशुद्धिर्हि तत्फलम्॥
म्हणून तू नेहमी देवाच्या श्रेष्ठ अशा नामाचे ध्यान करावेस. नामामुळे चित्तशुद्धीचे फल लाभते.

Tuesday, March 17, 2015

Dr. Chandrhas writes Gomatruvandanam.

॥चन्द्रहासविरचितं गोमातृवन्दनम्॥

वन्दे गोमातरं श्रेष्ठां
यया पुष्टा च संस्कृतिः।
आरोग्यदायिनीं वन्दे
वन्दे चामृतधारिणीम्॥

संस्कृती पुष्ट करणा-या श्रेष्ठ अशा त्या आरोग्यदायिनी, अमृत धारण करणा-या गोमातेला मी वंदन करतो.

अवध्या च सदा पूज्या
दिव्यत्वधारिणी शिवा।
शान्तिरूपा क्षमारूपा
मातृरूपा च रक्षिणी॥

जिची कधीही हत्या करू नये, अशी ती आहे. ती नेहमी पूज्य, दिव्यत्वधारिणी, पवित्रशान्तीरूप क्षमारूप मातृरूप व रक्षण करणारी अशी ती आहे.

दुग्धं दधिं च तक्रं च
नवनीतं घृतं तथा।
गोमुत्रं गोमयं चापि
निरामयाय सर्वथा॥

आरोग्यासाठी दूध दही ताक लोणी तूप गोमुत्र गोमय सर्वथा उपकारक आहेत.

अतोऽहं चन्द्रहासःस्तु
तां प्रणमामि मातरम्।
वयं तया च सास्माभिः
रक्षितव्या न संशयः॥

म्हणून मी चंद्रहास त्या मातेला वंदन करतो. आम्ही तिचेकडून व ती आमचेकडून रक्षणीय आहे; हे अगदी निःसंशय.

जय श्रीकृष्ण॥

Saturday, March 14, 2015

Dr. Chandrhas shastri writes on the concept of sukham.

Dr. Chandrhas shastri writes on the concept of sukham.

सुख कशाला म्हणावे; याचे उत्तर सोपे नाही. विश्वातील अनेक संघर्ष सुखाची व्याख्या आणि साधने या साठी तर झाले नाहीत ना? सुखाची कल्पना देश काल स्थिती आणि व्यक्ति सापेक्ष बदलते का? आणि जर होय; तर का? यात जसे वैविध्य तसे ऐक्यही असते ना?
अशा अनेक प्रश्नांच्या तरंगांच्या पृष्ठभूमीने सुचलेला हा श्लोक.

सुखस्य कल्पना भिन्ना
स्याद् प्रत्येकस्य चित्तशः।
सर्वोच्चसुखबुद्धौ तु
प्रायो भवति चैकता॥
प्रत्येकाची चित्तानुसार सुखाची कल्पना भिन्न असेल, मात्र सर्वोच्च सुखाबद्दलच्या बुद्धीत बहुधा एकता असते.

जय श्रीकृष्ण!!!

Thursday, March 12, 2015

Dr. Chandrhas writes on stable mind.

सुस्थिरं मनः॥
॥चन्द्रहासः॥

मनो संस्थितं सुस्थिरं यस्य तेन
जितं सर्वविश्वं च नैवावशिष्टम्।
विकल्पा विनष्टाः पुनः किं च तस्य
भयं चापि नष्टं मनश्चापि तुष्टम्॥

ज्याचे मन स्थिर झाले त्याने खरोखर सर्व विश्व जिंकले. (जिंकवयास) काही उरले नाही. विकल्प नष्ट झाले. अजून काय त्याचे? भय देखील नष्ट झाले आणि मन सुद्धा तुष्ट म्हणजे प्रसन्न झाले.

प्रचण्डं तथा शक्तियुक्तं समानं
वद त्वं किमन्यच्च वर्तेत चित्तात्।
प्रयत्नो हि कार्यः प्रसादाय तस्य
प्रसन्नं मनोऽर्हं तु सर्वं च दातुम्॥

चित्तापेक्षा अन्य त्या सम प्रचंड तथा शक्तियुक्त काय आहे; तू सांग. त्याच्या प्रसन्नतेसाठीच प्रयत्न करावा. प्रसन्न मन सर्व काही देण्यास समर्थ असते.

प्रसन्नैश्च भव्यैर्विचारैः सुपुष्टं
मनो मन्दिरं शारदाया हि मन्ये।
प्रकाशात् सकाशाच्च तस्यैवाधिगम्यस्
सुबन्धश्च मोक्षश्च मित्र त्वयैव॥

प्रसन्न व भव्य विचारांनी चांगले पुष्ट झालेल्या मनास मी शारदेचेच मंदिर मानतो. त्याच्या प्रकाशापासून व जवळून मित्रा, तू चांगला ऋणानुबंध व मोक्ष प्राप्त करावा.

Wednesday, March 11, 2015

Dr. Chandrhas writes on "Be less".

न्यूनत्त्वप्रशंसा।
॥चन्द्रहासः॥

न किञ्चिदधिकं स्यात्तु
वर्यं न्यूनं ततः परम्।
यथा हि सुलभो योगः
क्षेमस्तथा न वर्तते॥1॥
किंचिद् अधिक नसावे, त्यापेक्षा थोडे कमी असलेले चांगले. जसे योग म्हणजे जे प्राप्त नाही, ते मिळविणे सोपे असते तसे क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण करणे नसते.

सौन्दर्यं श्रीश्च विद्या च
भोजनं च तथा कला।
अधिकेन विघातस्तु
न्यूनेन रक्षणं भवेत्॥2॥

सौंदर्य, द्रव्य, विद्या, भोजन आणि कला अधिक असल्याने घात होतो आणि कमी असल्याने त्यांचे रक्षण होते.

मधूरकस्य कूपस्य
कं हरन्ति जनाः यथा।
न तथा लवणस्येदं
हरन्ति ते कदाचन॥3॥

मधूर पाण्याच्या विहीरीचे पाणी लोक जसे नेतात; तसे हे खारे पाणी कधी नेत नाहीत.

आधिक्यजो ह्यहङ्कारो
न्यूनत्त्वजा हि नम्रता।
किमिष्टं वद ते मित्र
यथार्थत्त्वेन सर्वथा॥4॥

अधिक असल्याने अहंकार उपजतो. कमी असल्याने विनम्रता येते. मित्रा, तू सांग की; तुझे वास्तवात सर्वथा काय इष्ट आहे?

नियमस्सिद्ध्यते कोऽपि
अपवादेन सर्वथा।
तथैनमपि मत्वैव
क्षम्यतां च त्वया कविम्॥

कोणताही नियम नेहमी अपवादाने सिद्ध  होतो. तसेच याचेही मानून तू कवीला क्षमा करावीस.

Monday, March 9, 2015

Dr. Chandrhas writes on the aims of life.

त्वया जीवितव्यम्।               

॥ चन्द्रहासः॥

क्षणार्थं कणार्थं त्वया जीवितव्यं
शतानां हितार्थं त्वया जीवितव्यम्।
जनार्थं गणार्थं त्वया जीवितव्यं
तथाचामृतार्थं त्वया जीवितव्यम् ॥1॥

क्षणासाठी कणासाठी तुला जगायचे आहे. अनेक लोकांच्या हितासाठी तुला जगायचे आहे. लोकांसाठी समूहासाठी तुला जगायचे आहे. तसेच अमर होण्यासाठी तुला जगायचे आहे.

प्रमार्थं प्रमाणं तथा संचर त्वं
विकासत्रयेभ्योऽभिसिद्धिं च दातुम्।
त्वमेव प्रचण्डोऽभिभूत्य स्वयं वै
सुकार्यं समाप्यं समष्ट्या हितार्थम् ॥2॥
जसे यथार्थ ज्ञानासाठी प्रमाण तसे तीनही विकासांना अभिसिद्धी प्रदान करण्यासाठी आचरण कर.
तुझ्याकडून स्वतः प्रचंड होऊन समष्टि हितार्थ कार्य संपन्न व्हावे.

बहूत्रापि कर्तुं सुयोग्यं त्वदर्थं
त्वया निश्चितव्यं त्वया किं च कार्यम्।
समागत्य लोके तु लोकाय कार्यं
सदा जीवनं तच्च याप्यं सुखेन ॥3॥

तुझ्यासाठी करण्यास योग्य असे येथे पुष्कळ काही आहे. तू निश्चित करावेस की, तुला काय करावयाचे आहे? या जगात येऊन लोकांसाठी कार्य करावे आणि जीवन सुखाने घालवावे.

Saturday, March 7, 2015

Dr. Chandrhas shastri writes on Bhagwati's Anirvachaniyatva.

मातृके......॥
॥चन्द्र

अविद्यापि च सा विद्या
महामाया च सा तथा।
सा त्वनिर्वचनीयेति
वाच्या पदेन सर्वथा॥

अविद्या, विद्या,महामाया , अशी ती भगवती अनिर्वचनीय पदाने सर्वथा वाच्य आहे. (ओळखली जाते.)

मायाऽपि मुक्तिहेतुः सा
बन्धस्य कारणं तथा।
कन्दुकस्य समा जीवाः
सैव क्रीडति लीलया॥

ती माया, मोक्षहेतु, बंधकारण आहे. जीव खेळणी आहेत. ती लीलया खेळते.

प्रष्टव्यं कथमेतन्न
ज्ञातुं हि कठिणं खलु।
किन्त्वनुभवितुं शक्यं
भक्त्या सुखेन मातृके॥

हे मातृके, हे कसे; असे विचारण्याची सोय नाही. मात्र भक्तीमुळे सुखाने ते अनुभविता येते.

Sunday, March 1, 2015

Dr. Chandrhas Shastri wrote about the sky

कथं किं च जानेऽम्बरस्यैकतत्त्वं
उपर्येव तिष्ठत्तु पश्यद्धरां च।
विवर्णान् सदा भूषयित्वापि तच्च
न केनापि वर्णेन चावर्ण्यते वै ॥

आकाशाचे एक तत्त्व कसे काय आहे मला समजत नाही. ते वर थांबत, पृथ्वीला न्याहाळत अनेक रंगांना नेहमी भूषवूनही कोणत्याही एका रंगाने (एका रंगाचे ते आहे असे) त्याचे वर्णन केल्या जात नाही.

कियद्व्यापकत्वं न केनापि वर्ण्यम्
इदं सर्वविश्वं तु तेनैव पूर्णम्।
नमाम्यम्बरं तच्च शब्दस्थलं च
घटानां मठानां च तस्माद् बहिस्थम् ॥

किती व्यापकत्व आहे ते कोणीच सांगू शकत नाही. हे सर्व विश्व त्यानेच भरले आहे. शब्दस्थल अशा त्या घट, मठ व त्या बाहेरच्या आकाशाला मी वंदन करतो.

खगानां च मेघादिनामट्टनाय
स्थलं चाधिवासाय ताराग्रहाणाम्।
श्रवत् सर्वनादं स्वतूष्णीं च तिष्ठत्
ध्रुवाधारमेतत् नमाम्यम्बरं तत् ॥

पक्षी व मेघांचे भ्रमणासाठीचे व ग्रहतारकांचे निवास स्थल, सर्व ध्वनी ऐकून स्वतः शांत राहणा-या ध्रुवाचा आधार असणा-या या आकाशाला मी वंदन करतो.

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...