न्यूनत्त्वप्रशंसा।
॥चन्द्रहासः॥
न किञ्चिदधिकं स्यात्तु
वर्यं न्यूनं ततः परम्।
यथा हि सुलभो योगः
क्षेमस्तथा न वर्तते॥1॥
किंचिद् अधिक नसावे, त्यापेक्षा थोडे कमी असलेले चांगले. जसे योग म्हणजे जे प्राप्त नाही, ते मिळविणे सोपे असते तसे क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण करणे नसते.
सौन्दर्यं श्रीश्च विद्या च
भोजनं च तथा कला।
अधिकेन विघातस्तु
न्यूनेन रक्षणं भवेत्॥2॥
सौंदर्य, द्रव्य, विद्या, भोजन आणि कला अधिक असल्याने घात होतो आणि कमी असल्याने त्यांचे रक्षण होते.
मधूरकस्य कूपस्य
कं हरन्ति जनाः यथा।
न तथा लवणस्येदं
हरन्ति ते कदाचन॥3॥
मधूर पाण्याच्या विहीरीचे पाणी लोक जसे नेतात; तसे हे खारे पाणी कधी नेत नाहीत.
आधिक्यजो ह्यहङ्कारो
न्यूनत्त्वजा हि नम्रता।
किमिष्टं वद ते मित्र
यथार्थत्त्वेन सर्वथा॥4॥
अधिक असल्याने अहंकार उपजतो. कमी असल्याने विनम्रता येते. मित्रा, तू सांग की; तुझे वास्तवात सर्वथा काय इष्ट आहे?
नियमस्सिद्ध्यते कोऽपि
अपवादेन सर्वथा।
तथैनमपि मत्वैव
क्षम्यतां च त्वया कविम्॥
कोणताही नियम नेहमी अपवादाने सिद्ध होतो. तसेच याचेही मानून तू कवीला क्षमा करावीस.
No comments:
Post a Comment