नमः सागराय।
- डाॅ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर
किमर्थं त्वमुच्छृङ्खलो जायसे रे
न तोयं त्वदीयं न भूमिस्त्वदीया।
तवेदं हि कार्यं नृणामेव साम्यं
त्वया त्याज्यमेतद्धि रत्नाकरोऽसि ॥1॥
अरे तू रत्नाकर आहेस. तू उच्छृंखल का बरे होतोस? ना पाणी तुझे ना जमीन तुझी. तुझे हे माणसांशी साम्य असलेले कार्य आहे; तू हे त्यागले पाहीजेस.
क्षणार्थं हि शान्तो न कुत्रापि तिष्ठन्
निनादं कुरूषे प्रवातस्य सख्यम्।
तडागः सुपेयेन तोयेन शोभन्
वद त्वं कदा सः करोतीति शब्दम् ॥2॥
क्षणासाठीही कोठे सुद्धा शांत थांबत नाहीस. वयुच्या सहाय्याने आवाज करतोस. सुपेत जलाने शोभणारे सरोवर सांग कधी आवाज करते?
कथं नैव कुप्ये वद त्वं च मित्र
प्रहिंसां परीक्ष्य त्वदीये च तीरे।
त्वदीयाश्रितानां न रक्षां कुरूषे
त्वया कार्यमेतद् प्रमादं विनात्र ॥3॥
तुझ्या तीरावरील हिंसा पाहून मित्रा, मी तुझ्यावर कसे रागावू नको सांग.
त्वया रक्षणीया हि मीनादयस्ते
त्वया पालनीया हि कर्कादयस्ते।
त्वमेको हि तेषां पिता पालनाय
त्वया त्याज्यमेतां स्थितिं दर्शकस्य ॥4॥
मीनादि सर्वांचे रक्षण तू करावेस. कर्कादि सर्वांचे पालन तू करावेस. तू त्यांचा पालक पिता आहेस. तू ही दर्शकाची स्थिती सोडून द्यावीस.
सुलोकाभिवन्द्यो रमायाः पिता त्वं
सुपूज्यश्च जातो रमेशस्य वासात् ।
मुनेः कारणादेव रक्षाभिजाता
तदर्थं हि तुभ्यं नमः सागराय ॥5॥
तू सुजनवंद्य आहेस. लक्ष्मीचा पिता तू आहेस. रमेशाच्या निवासामुळे तू पूज्य झालास. (अगस्त्य मुनींमुळे) तुझे रक्षण झाले. त्यासाठी तुला सागराला नमस्कार असो.
No comments:
Post a Comment