अहंकारनिषेधः।
॥चन्द्रहासः॥
यावज्जीवत्यहङ्कारो
तावन्नरो न जीवति।
प्रार्थितुं शक्यते नैव
भगवन्तं कदापि च॥1॥
जो पर्यंत अहंकार जीवंत आहे; तो पर्यंत माणूस जीवंत नसतो. भगवंताला प्रार्थना करणेही शक्य होत नाही.
न सिद्ध्यते शरण्यत्वं
न ध्यानं न हि चिन्तनम्।
द्रष्टव्यः सर्वतो यः तं
नैव पश्यति सः कदा॥2॥
शरण्यता, ध्यान व चिंतन साधत नाही. ज्याला सर्वत्र पहावयाचे, त्याला कधी पाहत नाही.
न ज्ञानं नैव दानं च
भक्तिरपि न सिद्ध्यते।
समर्पयति कालाय
स्वं स्वयमेव सः खलु॥3॥
ज्ञान, दान व भक्तीही साधत नाही. स्वतःच स्वतःस कालास अर्पण करतो.
तस्मात् त्याज्यस्त्वया सुहृद् अहङ्कारो भयङ्करः।
दृष्ट्वा तौ चरणौ मातुः
नतो भव नतो भव॥4॥
हे मित्रा, म्हणून या भयंकर अशा अहंकाराचा तू त्याग कर. आणि मातेचे चरण पाहून विनम्र हो. विनम्र हो.
No comments:
Post a Comment