Sunday, January 4, 2015

Dr. Chandrhas Shastri writes "Shiv-Stotram" in sanskrit

॥श्रीशिवपञ्चकम्॥
॥चन्द्रहासविरचितम्॥
नमः शिवाय जप्त्वा त्वं 
सहजं प्राप्स्यसे सुखम्।
मा विस्मर महादेवं
शैलजावल्लभं शिवम्।।1॥

तु नम: शिवाय जप करून सहज सुख प्राप्त करशील, पार्वतीप्रिय महादेवाला विसरू नकोस.

नाथः सः सकलानां
तथानाथानां विशेषतः।
जनास्तस्य महाकृपां 
लब्ध्वाऽनन्दीभवन्ति हि।।2॥

ते सर्वांचे नाथ आहेत. अनाथांचे विशेष नाथ आहेत, लोक त्यांची महाकृपा मिळाल्याने आनंदित होतात.

नीलकण्ठो महारुद्रः
शं करोतीति शङ्करः।
हिमाद्रितनयाकान्तः
विश्वनाथो जगत्पिता।।3॥

नीलकंठ, महारुद्र, सर्वांचे कल्याण करणारे शंकरजी पार्वतीचे पती, विश्वनाथ व जगतपिता आहेत. 

नन्दीध्वजः विभूतीशः
भुजंगपरिवेष्टितः। 
रजनीशप्रियः श्वेतः
शिवो मे पातु सत्वरम्।।4॥

नंदी वाहन असणारे, विभूतीश्वर, भुजङ्गानी परिवेष्टित, चन्द्रप्रिय व श्वेतवर्ण अशा शिवजीनी माझे सत्वर रक्षण करावे.

भागीरथीतटे वासः
भक्तजनमनस्स्वपि।
पार्वतीपरमेशः मां
हासं पातु सदा सदा।।5॥
 
भागीरथी तीरावर आणि भक्तजनांच्या मनात निवास करणाऱ्या पार्वतीपरमेश्वराने माझे चन्द्रहासाचे सदा सदा रक्षण करावे. 
 
इति। 

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...