Thursday, January 1, 2015

॥देवदर्शनम्॥चन्द्रहासः॥

॥देवदर्शनम्॥चन्द्रहासः॥

प्रकटनस्य देवस्य
न प्रश्नः वर्तते खलु।
दृष्टेः प्रश्नोऽस्ति नः परम्
सा प्रभवति वा न वा॥

प्रश्न देव दिसण्याचा नसतोच मुळी. प्रश्न असतो तो आमच्या दृष्टीचा; ती समर्थ आहे वा नाही.

देवोऽदृष्टो तथापीह
देवतुल्यः विलोकितः।
तस्माद् कल्पय देवत्वं
दृष्टिविकाससाधनम्॥

येथे देवाला पाहीले नाही तथापि देवतुल्य माणसे पाहीली. त्यावरून तू देवत्वाची कल्पना कर. हे दृष्टिविकसनाचे साधन आहे.

येषां दृष्टिः स्थिरोत्तमा
देवं पश्यन्ति ते जनाः।
ततः पश्यन्ति तद् रूपं
जले स्थले च पर्वते॥

ज्यांची दृष्टी स्थिर व उत्तम झाली आहे; ते लोक देवाला पाहतात. नंतर ते त्याचे रूप जल, स्थल, पर्वत अर्थात सर्वत्र पाहतात.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...