Wednesday, December 31, 2014

॥शिशुं पालय तारय ॥चन्द्रहासविरचितम्॥

॥शिशुं पालय तारय ॥
» डा. चन्द्रहास शास्त्री
 
अम्ब देहि मतिं मह्यम्
श्रध्दां विद्यां श्रियं तथा।
तपो देहि तितीक्षां च
शक्तिं सृजनहेतवे ॥1॥
 
हे माते मला सृजनासाठी मति , श्रद्धा , विद्या , सम्पदा तप , तितीक्षा व शक्ति दे. 

इच्छाशक्तिस्त्वमेवाम्ब
त्वं संकल्पाधिदेवता।
मार्गं दर्शय मातस्त्वं
शिशुं पालय तारय ॥2॥

आई , इच्छाशक्ती तूच आहेस, तू संकल्पाची अधिदेवता आहेस, माते , तू मार्ग दाखव.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर. 

तवाङ्के जीवनं मातः
जीवाम्यहं सुखेन तत्।
सहस्रास्सन्ति मे दोषाः
शिशुं पालय तारय ॥3॥
 
माते , तुझ्या कुशीत मी सुखाने जगतो, माझे हजार दोष आहेत ,  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

त्वत् कारणात् जगत् सर्वं
भासते दृश्यते ननु।
तवाश्रितं कुरुष्वाम्ब
शिशुं पालय तारय ॥4॥


खरोखर तुझ्या मुळेच सर्व जग भासते, दिसते. माते , तुझ्या आश्रित कर.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

एकवीरे त्वमेकैव
दयावतीः कृपावतीः।
तत्त्वमन्यत् न जानामि
शिशुं पालय तारय ॥5॥


एकवीरे , तू एकटीच दयावती, कृपावती आहेस, मी अन्य तत्त्व जाणत नाही.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर. 

तवाधारेण जीवामि
चलामि च चरामि च।
त्वदाधारं विना शून्यं
शिशुं पालय तारय ॥6॥


तुझ्या आधाराने जगतो,चालतो, वर्तन करतो. तुझ्या आधाराविना सर्व काही  शून्य आहे.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

अहङ्कारो न विद्यतां
सदास्तु मे शरण्यता।
ते पाद पङ्कजे ध्यानं
शिशुं पालय तारय ॥7॥


माझ्याकडे अहंकार नसावा, सदा शरण्यता असावी. तुझ्या चरणकमली ध्यान असावे.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

याचये वरमेकं हि
विस्मरणं तु मा भवेत्।
सदा स्मरानि ते नाम
शिशुं पालय तारय ॥8॥


एकच वर मागतो. विस्मरण होऊ नये. तुझे नाम सदैव स्मरावे.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

त्वमेव प्रार्थये नित्यं
नाम स्मरामि ते सदा।
यत्र कुत्रापि सर्वत्र
हासं पालय तारय ॥9॥


नित्य तुलाच प्रार्थना करतो. तुझे नाम सदा स्मरतो. जेथे कुठे सर्वत्र हासाचे पालन कर. रक्षण कर. 

इति।

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...