गुणत्रयधर्मयोः सम्बन्धः।
श्लोकरचना-
डाॅ. चन्द्रहास शास्त्री
सत्वे धर्मः स्थिरो गण्यः
व्यवहारो द्वितीयकः।
तृतीयकस्त्वधर्मः वै
संबधः गुणधर्मयोः॥1॥
सत्व गुणात धर्म, रजोगुणात व्यवहार आणि तमोगुणात अधर्म असतो, असा गुण आणि धर्म यांतील संबंध जाणावा.
प्रथमाचरणीयस्तु
यत्नेन मनुजेन सः।
द्वितीयस्तु भवत्येव
तृतीयं वर्जयेत् सदा॥2॥
माणसाने प्रयत्नपूर्वक सत्व गुणाचे आचरण करावे. रजोगुणाचे आचरण स्वाभाविक आहे. तमोगुणाचे आचरण मात्र नेहमी टाळावे.
धर्मरूपास्तु सत्वांशाः
रजांशाः प्राप्नुवन्ति च।
यस्यास्ति तामसी वृत्तिः
सर्वं नाशयतीति सः॥3॥
सत्वप्रधान लोक साक्षात् धर्माचे रूप असतात. राजसी लोक काही तरी प्राप्त करतात. आणि ज्यांची वृत्ती तामसी असते, ते सर्व काही नष्ट करतात.
No comments:
Post a Comment