Wednesday, December 24, 2014

दृश्यमानं मनः।डा. चन्द्रहासशास्त्री-सोनपेठकरः।

दृश्यमानं मनः।
डा. चन्द्रहासशास्त्री-सोनपेठकरः।
यथान्तः सागरः क्षुब्धः
बहिरपि तथैव सः।
दृश्यमानं मनः मन्ये
तरङगोत्पतनं समम्॥1॥
ज्या प्रमाणे अन्तःकरण त्या प्रमाणे बाहेर सागर क्षुब्ध आहे. तरंगांचे उसळणे म्हणजे जणु विचारांचे मनातील थैमान. खरोखर हा समुद्र पाहता येण्याजोगे मनच आहे जणु.
निमज्जनं तरङ्गेषु
तीरेषूपासनं बहु।
मुहुर्मुहुः चलन्तीरे
मुदितोऽहं विचार्य वै॥2॥
(विचार व समुद्राच्या) लाटांमध्ये बुडणे, काठावर बसणे, तीरावर हळूवार चालत चालत विचार करणे यांनी मी आनंदित झालो.
नौकाविहारहेतुस्तु
डाॅल्फिन्मीनस्य दर्शनम्।
चक्राकारेण भ्रमन् सः
दैवरूपमुवाच वै॥3॥
डाॅल्फिन मासा पहाण्यासाठी नौकाविहार केला. चाकाप्रमाणे फिरणा-या त्या मास्याने दैवाचे रूपच जणु सांगितले.
लवणवारिणौक्तं तद्
दुर्लोभस्य फलं महत्।
रत्नाकरस्य तृष्णैषा  
सर्वं भवतु मे जलम्॥4॥
दुर्लोभाचे मोठे फळ खा-या पाण्याने सांगितले. स्वतः सर्व रत्नांचे आकर असूनही रत्नाकराची तृष्णा होती की, विश्वातील सर्व पाणी माझे व्हावे.
नारिकेलवृक्षैः शोभा
तीरस्य वर्धते खलु।
शोभते सुविचारैः तद्
मानसमन्दिरं यथा॥5॥
नारळाच्या वृक्षांनी तीराची शोभा वाढते. जसे सुविचारांनी मनमंदिर शोभायमान होते.
समुद्रस्यामुखे मुख्या
वालुकाध्यापिका खलु।
पादतलात् स्खलन्ती सा
यथा वेलाभिगच्छति॥6॥
समुद्राच्या तोंडाशी असणारी वाळू तर मुख्य अध्यापिका. पायाखालून सरकणारी ती म्हणजे निसटणा-या वेळेसारखी.
रात्रौ प्रकाशमानास्ते
प्रदीपाः सोत्तमाः खलु।
सुमार्गं दर्शयन्तस्ते
मन्दं मन्दं प्रकाश्य हि॥7॥
रात्री मंद मंद प्रकाशमान असे ते दीप चांगल्या माणसाप्रमाणे सन्मार्ग दाखवितात.
हर्षमुपागताः सर्वे
पर्यटकाः विलोक्य तद्।
मनसः दृश्यरूपं हि
समुद्रमिति भावये॥8॥
असे हे सामुद्रिक दृश्य पाहून सर्व पर्यटक आनंदी झाले. मला तर ते मनाचे दृश्यस्वरूपच वाटले.
इति।

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...