नैव बिभेमि कृष्ण त्वत्
तत्त्वं जानामि नैव ते।
रागाद्भिन्नं न रूपं ते
इत्येव ज्ञायते मया॥1॥
कृष्णा मी तुला भीत नाही. तुझे तत्त्व जाणत नाही. प्रेमापासून भिन्न असे तुझे रूप नाही; इतकेच मी जाणतो.
शरण्यं त्वामहं वन्दे
वासस्ते हृदये मम।
वद वससि कुत्र त्वं
बहिरन्यत्र केशव॥2॥
शरण्य अशा तुला मी वंदन करतो. तू माझ्या हृदयात राहतोस. केशवा, सांग बाहेर अन्य कोठे राहतोस?
आवयोः युगलं सम्यक्
कल्पान्तेऽपि ध्रुवं हि तत्।
मधुरा निर्भया प्रीतिः
त्वयि भवतु मे सदा॥3॥
आपले भगवान आणि भक्त असे सम्यक् युगल आहे. ते कल्पांतीही ध्रुव आहे. माझी मधूर, निर्भय प्रीति तुझेवर नेहमी असावी.
कोपं स्नेहं करोम्यहं
तवोपरि जनार्दन।
क्वचिन्मौनं क्वचिज्जल्पं
समर्पयामि माधव॥4॥
जनार्दना, तुझ्यावर राग लोभ करतो. हे माधवा, तुला कधी मौन तर कधी बडबड समर्पित करतो.
नीलवर्णं करे चक्रं
चतुर्भुजं नरोत्तमम्।
कृष्णचन्द्रं मुखे हासं
वन्दे मानसहंसकम्॥5॥
नीलवर्ण, हाती चक्र, चतुर्भुज, पुरुषोत्तम, मुखी हास्य अशा मानसीच्या हंसाला, श्रीकृष्णचंद्राला मी वंदन करतो.
इति चन्द्रहासविरचितं श्रीकृष्णपञ्चकम्।
जयतु श्रीकृष्णः॥
No comments:
Post a Comment