Thursday, December 25, 2014

चन्द्रहासविरचित-॥हिन्दुधर्मो विभूषितः॥

हिन्दुधर्मो विभूषितः।
॥चन्द्रहासविरचितम्॥
आकरः सर्वशास्त्राणां
दर्शनानां च ज्ञानदः।
वैविध्येन विचाराणां
हिन्दुधर्मो विभूषितः
॥1॥
सर्व शास्त्रांचे आकर अनेक दर्शनांचे ज्ञान देणारा हिन्दु धर्म विचारांच्या विविधतेने शोभून दिसतो.
उपकारकपूजा हि
लक्षणं मधुरं खलु।
पूजनीयारनेकाऽत्र
तत्त्वमेकमुपास्यते॥2॥
उपकारक अशा निसर्गातील विविध घटकांची पूजा हे सुंदर व मधुर लक्षण आहे. येथे पूजनीय अनेक आहेत. तरी एका तत्त्वाची उपासना केली जाते.
ॐकारतत्त्वमद्वैतं
परब्रह्मस्वरूपिणम्।
पूज्यते नैकरूपेषु
तत्त्वमेकं सनातनम्॥3॥
ॐकार हे परब्रह्मस्वरूप अद्वैत तत्त्व आहे. ते सनातन एक तत्त्व अनेक रूपांमध्ये पूजिल्या जाते.
परधर्मस्य निन्दाऽत्र
न क्रीयते कदापि च।
आक्रमणं च पीडाऽत्र
न क्रीयते न सह्यते॥4॥
इतर धर्माची येथे कधीही निन्दा केली जात नाही. आक्रमण आणि परपीडा ना केली जाते ना सहन केली जाते.
आक्रमणानि पक्त्वाऽपि
यथापूर्वं विराजते।
आत्मबले दृढां श्रद्धां
धृत्वैष रक्षितः पुरा ॥5॥
अनेक आक्रमणे पचवून सुध्दा हिंदू धर्म पूर्वीप्रमाणेच शोभून दिसतो. आत्मबलावर दृढ श्रध्दा ठेवून पूर्वी याचे रक्षण करण्यात आले.
स्वराज्ये रक्षणीयस्सः
प्रयत्नेन जनैस्तथा।
स्वधर्मे निधनं श्रेयं
वाक्यं भगवदुद्धृतम्॥6॥
स्वराज्यात लोकांनी प्रयत्नपूर्वक याचे रक्षण करावे. स्वधर्मातील मरणही श्रेयस्कर असे भगवद्वचन आहे.
सरलोऽपि विशालोऽयं
भुक्तिमुक्तिप्रदायकः।
तत्त्वज्ञानेन सिध्दोऽयं
सर्वकल्याणहैतुकः॥7॥
सरळ असूनही व्यापक, ऐश्वर्य आणि मोक्ष देणारा, तत्त्वज्ञानाने सिध्द झालेला हा धर्म सर्वांच्या कल्याणासाठी आहे.
प्राचीनो धर्म एष वै
विजयतां विराजताम्।
हैन्दवाः बान्धवास्सर्वे
स्युः प्रयत्नरतास्तथा ॥8॥
हा प्राचीन धर्म विजयी व्हावा, शोभायमान व्हावा यासाठी सर्व हिन्दुबान्धव प्रयत्नरत व्हावेत.
इत्येव प्रार्थयन् नित्यं
जनार्दनं जनान्नपि ।
चन्द्रहासः स्वयंसिध्दो
धर्मरक्षणहेतवे॥
अशीच प्रार्थना जनार्दनास व लोकांस करणारा चन्द्रहास धर्मरक्षणार्थ सिध्द झाला आहे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...