डॉ. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर |
चन्द्रहासविरचितं काव्यम्
॥ भक्तिदेवीं नमाम्यहम् ॥
दीनता महदैश्वर्यं
तथैश्वर्यं हि दीनता।
भक्तेर्विशेषतां पश्य
कथमियं जनोत्तरा॥1॥
दीनता हे मोठे ऐश्वर्य व ऐश्वर्य ही मोठी दीनता अशी भक्तीची विशेषता पहा; ती कशी लोकोत्तर आहे.
कृष्णवर्णः प्रियो जातः
कालिकाकृष्णकारणात्।
भक्तोच्छिष्टफलं रामो
खादितवान् सुखेन हि ॥2॥
कालिका माता व् श्रीकृष्णामुळे कृष्ण वर्ण प्रिय झाला, भक्ताने उष्टे केलेले फल श्रीरामाने सुखाने खाल्ले.
त्रिषु योगेषु सत्यं यद्
भक्तिरेव गरीयसी।
ज्ञानवैराग्ययोर्माता
सकलहितकारिणी॥3॥
तीनही योगांमध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे. ज्ञान व वैराग्य यांची ती माता आहे. ती सर्वांचे हित करणारी आहे.
नवधा मधुरा दिव्या
दुर्लभा पंचमा तथा।
महाराष्ट्रे विशेषेण
विहरन्ती युगे युगे॥4॥
ती नऊ प्रकारची, दिव्य, पाचवा पुरुषार्थ अशी आहे. महाराष्ट्रात ती युगानुयुगे विशेष करून विहार करीत आहे.
उद्धवोत्कर्षकुर्वन्तीं
भक्तिदेवीं नमाम्यहम्।
भारतफलदात्रीं तां
नमामि कृष्णचन्द्रिकाम् ॥5॥
उद्धवाचा उत्कर्ष करणाऱ्या भक्तिदेवीला मी नमस्कार करतो. अर्जुनाला फल देणाऱ्या त्या कृष्णचंद्रिकेला नमस्कार करतो.
क्रीयते कर्म सद्भिर्वै
ज्ञानं तु विद्यते सदा।
विशिष्टविषयो भक्ति
राविर्भवति सा स्वयम् ॥6॥
सज्जनांकडून कर्म केले जाते. ज्ञान तर असतेच, भक्ति मात्र विशिष्टविषय आहे. ती स्वयमेव प्रकट होते.
नित्या च शुद्धसत्वा च
हृदयाह्लादिनी तथा ।
तापसंतापसंहर्त्री
मधुरा मोददायिनी ॥7॥
नित्य, शुद्ध सत्त्वयुक्त तसेच हृदयाला आह्लादित करणारी, ताप व संताप संहार करणारी, मधुरा व आनन्ददायिनी अशी ती आहे.
शैवी च वैष्णवी चेय
मक्षदा मोक्षदायिनी।
प्रार्थना चन्द्रहासस्य
भक्तिस्तु मे सदा हृदि ॥8॥
शैवी आणि वैष्णवी, अविनाशी दृष्टी प्रदान करणारी मोक्षदायिनी अशी ती भक्ति नेहमी माझ्या हृदयात असावी, अशी चन्द्रहासाची प्रार्थना आहे.
जय श्रीकृष्ण!
No comments:
Post a Comment