Saturday, April 25, 2015

Dr. Chandrhas shastri writes on aesthetics

॥सौन्दर्यगीतम्॥
॥चन्द्रहासः॥

अध्यात्मं चानुरागश्च
सौन्दर्यं वर्तते तयोः।
व्यष्टिभावेन रागश्च
समष्टिभावना परे॥
अध्यात्म आणि अनुराग म्हणजे स्नेह या दोहोंतही सौन्दर्य असते. व्यक्तिभावाने स्नेह तर समाजभावनेने अध्यात्म साधले जाते.

इन्द्रियसन्निकर्षे तद्
सौन्दर्यं क्षणमोददम् ।
भवति तदिदं भक्त्यां
कालातीतप्रमोददम्॥
नेत्र, मन इ. इंद्रियसंबंधात जे सौंदर्य क्षणिक आनंद देते. ते हे सौंदर्य भक्तीसंबंधाने मात्र कालजयी व  प्रकर्षाने आनंद देणारे ठरते.

आनन्दः स्थायिभावोऽस्ति
सौन्दर्यस्य तु सर्वथा।
क्षणाय वा चिराय स्यात्
निश्चितव्यं त्वया प्रिय॥
मित्रा, आनंद हा सौन्दर्याचा सर्वथा स्थायीभाव आहे. हा आनंद क्षणासाठी हवा की अनंत कालासाठी हे तुला निश्चित करावयाचे आहे.

शक्तिरूपं हि सौन्दर्यं
शक्तियुक्ताय वर्तते।
तस्मादेव समुक्तं यद्
वीरा भोग्या वसुन्धरा॥
शक्तिरूप असे हे सौंदर्य शक्तियुक्तासाठी म्हणजे सामर्थ्यवानासाठी असते. म्हणूनच म्हटले जाते की,
वीरा भोग्या वसुन्धरा.

गीत्वा सौन्दर्यगीतं वै
हासस्तु मुदितः स्वयम्।
यथा मुदति चन्द्रोऽयं
स्वकलयाम्बरे स्थितः॥
जसे चंद्र आपल्या कलेने आकाशात स्थित होवून आनंदित होतो, तसे हे सौंदर्यगीत गाऊन हास स्वतः आनंदित झाला.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...