Wednesday, December 31, 2014

॥शिशुं पालय तारय ॥चन्द्रहासविरचितम्॥

॥शिशुं पालय तारय ॥
» डा. चन्द्रहास शास्त्री
 
अम्ब देहि मतिं मह्यम्
श्रध्दां विद्यां श्रियं तथा।
तपो देहि तितीक्षां च
शक्तिं सृजनहेतवे ॥1॥
 
हे माते मला सृजनासाठी मति , श्रद्धा , विद्या , सम्पदा तप , तितीक्षा व शक्ति दे. 

इच्छाशक्तिस्त्वमेवाम्ब
त्वं संकल्पाधिदेवता।
मार्गं दर्शय मातस्त्वं
शिशुं पालय तारय ॥2॥

आई , इच्छाशक्ती तूच आहेस, तू संकल्पाची अधिदेवता आहेस, माते , तू मार्ग दाखव.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर. 

तवाङ्के जीवनं मातः
जीवाम्यहं सुखेन तत्।
सहस्रास्सन्ति मे दोषाः
शिशुं पालय तारय ॥3॥
 
माते , तुझ्या कुशीत मी सुखाने जगतो, माझे हजार दोष आहेत ,  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

त्वत् कारणात् जगत् सर्वं
भासते दृश्यते ननु।
तवाश्रितं कुरुष्वाम्ब
शिशुं पालय तारय ॥4॥


खरोखर तुझ्या मुळेच सर्व जग भासते, दिसते. माते , तुझ्या आश्रित कर.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

एकवीरे त्वमेकैव
दयावतीः कृपावतीः।
तत्त्वमन्यत् न जानामि
शिशुं पालय तारय ॥5॥


एकवीरे , तू एकटीच दयावती, कृपावती आहेस, मी अन्य तत्त्व जाणत नाही.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर. 

तवाधारेण जीवामि
चलामि च चरामि च।
त्वदाधारं विना शून्यं
शिशुं पालय तारय ॥6॥


तुझ्या आधाराने जगतो,चालतो, वर्तन करतो. तुझ्या आधाराविना सर्व काही  शून्य आहे.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

अहङ्कारो न विद्यतां
सदास्तु मे शरण्यता।
ते पाद पङ्कजे ध्यानं
शिशुं पालय तारय ॥7॥


माझ्याकडे अहंकार नसावा, सदा शरण्यता असावी. तुझ्या चरणकमली ध्यान असावे.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

याचये वरमेकं हि
विस्मरणं तु मा भवेत्।
सदा स्मरानि ते नाम
शिशुं पालय तारय ॥8॥


एकच वर मागतो. विस्मरण होऊ नये. तुझे नाम सदैव स्मरावे.  आपल्या लेकराचे पालन व रक्षण कर.

त्वमेव प्रार्थये नित्यं
नाम स्मरामि ते सदा।
यत्र कुत्रापि सर्वत्र
हासं पालय तारय ॥9॥


नित्य तुलाच प्रार्थना करतो. तुझे नाम सदा स्मरतो. जेथे कुठे सर्वत्र हासाचे पालन कर. रक्षण कर. 

इति।

Monday, December 29, 2014

॥तेऽनुष्ठानफलं हि तत्॥चन्द्रहासः॥

कधी कधीच असं होतं की,  रसिकाकडून कृती घडते, कवी त्या कृतीस अनुलक्षून काव्य रचतो आणि रसिक अचूक वेध घेतो त्या आपल्या काव्यकारणकृतीचा. हो, हे शक्य आहे. श्रीवागीश्वरीला अशा वेळी कवीला झालेला आनंद  समर्पित करणारा हा ब्लाॅग.
॥तेऽनुष्ठानफलं हि तत्॥
           »» चन्द्रहासः।
काव्यस्य मूलपर्यन्तं
गच्छति रसिको यदि।
मन्यतां शारदा तुष्टा
तस्यास्सुफलिता कृपा ॥1॥
क्वचिद्भवति मूलेऽस्मिन्
संस्थितो रसिकस्स्वयम्।
अन्वेषयति मूलं सः
कवेर्सुखं कियद्वद ॥2॥
येन विहाय व्यर्थं वै
काव्ययज्ञो हि सर्वथा।
रसज्ञं नौमि तस्माच्च
तदृणे हि स्थितोस्म्यहम्  ॥3॥
ऋणं मधुरमेतद्धि
कवेर्धनं तदेव वै।
रसिकस्यैव सेवार्थं
जयन् जीवन् कविस्सदा ॥4॥
भवेयं शारदे देवी
विनम्राम्रतरुः समः।
यो रसमञ्जिरीं धृत्वा
न त्यजेत् नम्रतां कदा ॥5॥
ते चरणतले मातः
सुखेन निवसामि च।
हंसध्वजे कृपां कृत्वा
शिशुं पालय लालय ॥6॥
त्वया प्रतिभा दत्ता
रक्षणीया त्वया हि सा।
ममेति नास्ति किञ्चिद्धि
तव तुभ्यं समर्पये ॥7॥
बाल्यादेव कृपां तेऽहमनुभवामि शारदे।
वक्तुं शक्नोमि शब्दं तेऽनुष्ठानफलं हि तत् ॥8॥

Sunday, December 28, 2014

॥किमर्थं वचनं तत्र॥ चन्द्रहासः॥

॥किमर्थं वचनं तत्र॥
           » चन्द्रहासः।
यदुक्तमुत्तमं मित्र
यन्नोक्तमुत्तमोत्तमम्।
यन्नोक्त्वापि त्वयोक्तं वै
मन्ये सर्वोत्तमं हि तद् ॥1॥
मित्रा, तू उत्तम बोललास. जे बोलला नाहीस, ते तर बहूत्तम होते. जे न बोलता ही बोललास; ते सर्वोत्तम होते असे मी मानतो.
किमर्थं वचनं तत्र
यत्र नोक्त्वापि ज्ञायते ।
जिह्वाचक्षुविक्षेपान्स्ते
मन्ये निरर्थकाः खलु ॥2॥
जेथे न बोलता सुध्दा जाणले जाते, तेथे बोलणे कशाला हवे? जीभ, डोळे, हावभाव हे देखील खरोखर निरर्थक वाटतात.
आवयोर्भाषणं केन
श्रुत्वापि ज्ञायते वद।
भावानां भूमिका तत्र
शब्दौचित्यं करोति किम् ॥3॥
आपले बोलणे ऐकूनही कोणाला कळते सांग. भावनांची भूमिका आहे; तेथे शब्दौचित्य काय करेल?
मन्येऽहं दुर्लभं सख्य
मेतादृशं कलौ युगे।
महत्पुण्येन लब्धं तद्
चिरं जीवतु कामये ॥4॥
असे सख्य कलियुगात दुर्लभ वाटते. मोठ्या पुण्याने ते लाभले. ते चिरकाल राहो.
आस्थाप्य ह्रदि सत्यं यः
सत्वांशमेव जीवति।
मनस्तस्य पवित्रं च
निर्मलमिति मे मतिः ॥5॥
हृदयात सत्याची स्थापना करून सत्वांश तेवढे जो जगतो, त्याचे मन पवित्र आणि निर्मल असते; असे माझे मत आहे.
विलसति प्रमोदस्सः
मनसि निर्मले तथा।
यथा शिवो हिमाद्रौ
स्थितो भस्मविलेपितः ॥6॥
निर्मल मनात आनंद त्याप्रमाणे राहतो की, ज्याप्रमाणे हिमालयात भस्मविलेपित शिव थांबले आहेत.
शिवसंकल्पयुक्तं च
विशालं व्यापकं मनः।
कुत्रचिदपि नापेक्ष्य
मीश्वरेच्छा बलीयसी ॥7॥
अशा या शुभसंकल्पयुक्त विशाल व व्यापक मनाची अपेक्षा कोठेही करू नये. या बाबतीत भगवंताची इच्छा बलवती आहे.
शब्दमनुसरन्नर्थः
यमस्तत्र न वर्तते।
भाषैषा मानसी ज्ञाता
निर्मलचेतसां कृते ॥8॥
शब्दाला अर्थ अनुसरतो; हा नियम तेथे नाही. ही मनाची भाषा शुध्दमनाच्या लोकांसाठीच ओळखली जाते.

Thursday, December 25, 2014

चन्द्रहासविरचित-॥हिन्दुधर्मो विभूषितः॥

हिन्दुधर्मो विभूषितः।
॥चन्द्रहासविरचितम्॥
आकरः सर्वशास्त्राणां
दर्शनानां च ज्ञानदः।
वैविध्येन विचाराणां
हिन्दुधर्मो विभूषितः
॥1॥
सर्व शास्त्रांचे आकर अनेक दर्शनांचे ज्ञान देणारा हिन्दु धर्म विचारांच्या विविधतेने शोभून दिसतो.
उपकारकपूजा हि
लक्षणं मधुरं खलु।
पूजनीयारनेकाऽत्र
तत्त्वमेकमुपास्यते॥2॥
उपकारक अशा निसर्गातील विविध घटकांची पूजा हे सुंदर व मधुर लक्षण आहे. येथे पूजनीय अनेक आहेत. तरी एका तत्त्वाची उपासना केली जाते.
ॐकारतत्त्वमद्वैतं
परब्रह्मस्वरूपिणम्।
पूज्यते नैकरूपेषु
तत्त्वमेकं सनातनम्॥3॥
ॐकार हे परब्रह्मस्वरूप अद्वैत तत्त्व आहे. ते सनातन एक तत्त्व अनेक रूपांमध्ये पूजिल्या जाते.
परधर्मस्य निन्दाऽत्र
न क्रीयते कदापि च।
आक्रमणं च पीडाऽत्र
न क्रीयते न सह्यते॥4॥
इतर धर्माची येथे कधीही निन्दा केली जात नाही. आक्रमण आणि परपीडा ना केली जाते ना सहन केली जाते.
आक्रमणानि पक्त्वाऽपि
यथापूर्वं विराजते।
आत्मबले दृढां श्रद्धां
धृत्वैष रक्षितः पुरा ॥5॥
अनेक आक्रमणे पचवून सुध्दा हिंदू धर्म पूर्वीप्रमाणेच शोभून दिसतो. आत्मबलावर दृढ श्रध्दा ठेवून पूर्वी याचे रक्षण करण्यात आले.
स्वराज्ये रक्षणीयस्सः
प्रयत्नेन जनैस्तथा।
स्वधर्मे निधनं श्रेयं
वाक्यं भगवदुद्धृतम्॥6॥
स्वराज्यात लोकांनी प्रयत्नपूर्वक याचे रक्षण करावे. स्वधर्मातील मरणही श्रेयस्कर असे भगवद्वचन आहे.
सरलोऽपि विशालोऽयं
भुक्तिमुक्तिप्रदायकः।
तत्त्वज्ञानेन सिध्दोऽयं
सर्वकल्याणहैतुकः॥7॥
सरळ असूनही व्यापक, ऐश्वर्य आणि मोक्ष देणारा, तत्त्वज्ञानाने सिध्द झालेला हा धर्म सर्वांच्या कल्याणासाठी आहे.
प्राचीनो धर्म एष वै
विजयतां विराजताम्।
हैन्दवाः बान्धवास्सर्वे
स्युः प्रयत्नरतास्तथा ॥8॥
हा प्राचीन धर्म विजयी व्हावा, शोभायमान व्हावा यासाठी सर्व हिन्दुबान्धव प्रयत्नरत व्हावेत.
इत्येव प्रार्थयन् नित्यं
जनार्दनं जनान्नपि ।
चन्द्रहासः स्वयंसिध्दो
धर्मरक्षणहेतवे॥
अशीच प्रार्थना जनार्दनास व लोकांस करणारा चन्द्रहास धर्मरक्षणार्थ सिध्द झाला आहे.

Wednesday, December 24, 2014

दृश्यमानं मनः।डा. चन्द्रहासशास्त्री-सोनपेठकरः।

दृश्यमानं मनः।
डा. चन्द्रहासशास्त्री-सोनपेठकरः।
यथान्तः सागरः क्षुब्धः
बहिरपि तथैव सः।
दृश्यमानं मनः मन्ये
तरङगोत्पतनं समम्॥1॥
ज्या प्रमाणे अन्तःकरण त्या प्रमाणे बाहेर सागर क्षुब्ध आहे. तरंगांचे उसळणे म्हणजे जणु विचारांचे मनातील थैमान. खरोखर हा समुद्र पाहता येण्याजोगे मनच आहे जणु.
निमज्जनं तरङ्गेषु
तीरेषूपासनं बहु।
मुहुर्मुहुः चलन्तीरे
मुदितोऽहं विचार्य वै॥2॥
(विचार व समुद्राच्या) लाटांमध्ये बुडणे, काठावर बसणे, तीरावर हळूवार चालत चालत विचार करणे यांनी मी आनंदित झालो.
नौकाविहारहेतुस्तु
डाॅल्फिन्मीनस्य दर्शनम्।
चक्राकारेण भ्रमन् सः
दैवरूपमुवाच वै॥3॥
डाॅल्फिन मासा पहाण्यासाठी नौकाविहार केला. चाकाप्रमाणे फिरणा-या त्या मास्याने दैवाचे रूपच जणु सांगितले.
लवणवारिणौक्तं तद्
दुर्लोभस्य फलं महत्।
रत्नाकरस्य तृष्णैषा  
सर्वं भवतु मे जलम्॥4॥
दुर्लोभाचे मोठे फळ खा-या पाण्याने सांगितले. स्वतः सर्व रत्नांचे आकर असूनही रत्नाकराची तृष्णा होती की, विश्वातील सर्व पाणी माझे व्हावे.
नारिकेलवृक्षैः शोभा
तीरस्य वर्धते खलु।
शोभते सुविचारैः तद्
मानसमन्दिरं यथा॥5॥
नारळाच्या वृक्षांनी तीराची शोभा वाढते. जसे सुविचारांनी मनमंदिर शोभायमान होते.
समुद्रस्यामुखे मुख्या
वालुकाध्यापिका खलु।
पादतलात् स्खलन्ती सा
यथा वेलाभिगच्छति॥6॥
समुद्राच्या तोंडाशी असणारी वाळू तर मुख्य अध्यापिका. पायाखालून सरकणारी ती म्हणजे निसटणा-या वेळेसारखी.
रात्रौ प्रकाशमानास्ते
प्रदीपाः सोत्तमाः खलु।
सुमार्गं दर्शयन्तस्ते
मन्दं मन्दं प्रकाश्य हि॥7॥
रात्री मंद मंद प्रकाशमान असे ते दीप चांगल्या माणसाप्रमाणे सन्मार्ग दाखवितात.
हर्षमुपागताः सर्वे
पर्यटकाः विलोक्य तद्।
मनसः दृश्यरूपं हि
समुद्रमिति भावये॥8॥
असे हे सामुद्रिक दृश्य पाहून सर्व पर्यटक आनंदी झाले. मला तर ते मनाचे दृश्यस्वरूपच वाटले.
इति।

Thursday, December 18, 2014

चन्द्रहासविरचितं श्रीराधाकृष्णाष्टकम्।

॥चन्द्रहासविरचितं
श्रीराधाकृष्णाष्टकम्॥
श्रीराधासहितं तत्त्वं
भगवन्तं सुशामलम्।
वृषभानुकिशोरीशं
कृष्णं वन्दे पुनः पुनः॥1॥
विना राधामनाथं तं
राधानाथमहत्प्रभुम्।
नमामि राधिकाप्राणं
प्राणनाथं जगत्पतिम्॥2॥
सर्वसुखस्य दातारं
युगलाकाररूपकम्।
निर्मलचेतसाभिश्च
दृश्यं सुमधुरं नवम्॥3॥
गायन्ति कीर्तयन्तीति
भक्तिरित्यभिधीयते।
आनन्दन्ति हि भक्तास्ते
रतिभावे स्थितो रसः ॥4॥
भक्तानां नर्तने कृष्ण-
रनुभूतिस्तु राधिका।
कृष्णस्य हृदयं राधा
प्राणरेकस्तु देहौ द्वौ॥5॥
अमृतादपि वर्यं तत्
राधाकृष्णेति नाम वै।
यथा रूपं तथा नाम
पुण्यदं सुखदं महत्॥6॥
त्रिषु योगेषु सत्यं यत्
भक्तिरेव गरीयसी।
कर्तुं ज्ञातुं न शक्यं वै
भवति स्वयमेव सा॥7॥
जिह्वायां नाम तन्नित्यं
वसतु राधिकेश मे।
संस्तुत्य युगलं रूपं
हासः प्राञ्जलिरानतः ॥8॥
जयतु श्रीकृष्णः।

Wednesday, December 17, 2014

चन्द्रहासविरचित-परावलम्बित्वनिषेधः।

चन्द्रहासविरचित-परावलम्बित्वनिषेधः।

दयार्हास्तेजनास्तत्र
ये परेष्ववलम्बिताः।
नास्ति मार्गोदयस्तेषां
चतुष्कोणे स्थिताः सदा॥1॥

जे परावलंबी लोक असतात, ते दयनीय असतात. नेहमी चौकात थांबतात पण त्यांना मार्ग काही सापडत नाही.

कुतः कुत्र च गन्तव्यं
कथं च ज्ञायते न तैः।
स्वप्नावस्थासु जीवन्ति
यथार्थे जल्पने रताः॥2॥

कोठून कोठे कसे जायचे हे त्यांच्याकडून जाणले जात नाही. ते स्वप्नात जगतात आणि वास्तवात व्यर्थ बडबडीत मग्न असतात.

जनाः प्रतीक्षमाणास्ते
न लभन्ते सुखं परम्।
उपदिष्टुं हितं कर्तुं
कोऽत्र समर्थ्यते वद॥3॥

अशा त्या वाट पाहणा-या लोकांना सुख मात्र लाभत नाही. अशा लोकांना उपदेश करण्यास त्यांचे हित करण्यास येथे कोण बरे समर्थ ठरते; सांग.

चन्द्रहासविरचितं गुणत्रय-धर्म-लघु-विवेचनम्।

गुणत्रयधर्मयोः सम्बन्धः।
श्लोकरचना-
डाॅ. चन्द्रहास शास्त्री

सत्वे धर्मः स्थिरो गण्यः
व्यवहारो द्वितीयकः।
तृतीयकस्त्वधर्मः वै
संबधः गुणधर्मयोः॥1॥

सत्व गुणात धर्म, रजोगुणात व्यवहार आणि तमोगुणात अधर्म असतो, असा गुण आणि धर्म यांतील संबंध जाणावा.

प्रथमाचरणीयस्तु
यत्नेन मनुजेन सः।
द्वितीयस्तु भवत्येव
तृतीयं वर्जयेत् सदा॥2॥

माणसाने प्रयत्नपूर्वक सत्व गुणाचे आचरण करावे. रजोगुणाचे आचरण स्वाभाविक आहे. तमोगुणाचे आचरण मात्र नेहमी टाळावे.

धर्मरूपास्तु सत्वांशाः
रजांशाः प्राप्नुवन्ति च।
यस्यास्ति तामसी वृत्तिः
सर्वं नाशयतीति सः॥3॥

सत्वप्रधान लोक साक्षात्  धर्माचे रूप असतात. राजसी लोक काही तरी प्राप्त करतात. आणि ज्यांची वृत्ती तामसी असते, ते सर्व काही नष्ट करतात.

Monday, December 15, 2014

॥चन्द्रहासविरचितं श्रीकृष्णपञ्चकम्॥

नैव बिभेमि कृष्ण त्वत्
तत्त्वं जानामि नैव ते।
रागाद्भिन्नं न रूपं ते
इत्येव ज्ञायते मया॥1॥

कृष्णा मी तुला भीत नाही. तुझे तत्त्व जाणत नाही. प्रेमापासून भिन्न असे तुझे रूप नाही; इतकेच मी जाणतो.

शरण्यं त्वामहं वन्दे
वासस्ते हृदये मम।
वद वससि कुत्र त्वं
बहिरन्यत्र केशव॥2॥

शरण्य अशा तुला मी वंदन करतो. तू माझ्या हृदयात राहतोस. केशवा, सांग बाहेर अन्य कोठे राहतोस?

आवयोः युगलं सम्यक्
कल्पान्तेऽपि ध्रुवं हि तत्।
मधुरा निर्भया प्रीतिः
त्वयि भवतु मे सदा॥3॥

आपले भगवान आणि भक्त असे सम्यक् युगल आहे. ते कल्पांतीही ध्रुव आहे. माझी मधूर, निर्भय प्रीति तुझेवर नेहमी असावी.

कोपं स्नेहं करोम्यहं
तवोपरि जनार्दन।
क्वचिन्मौनं क्वचिज्जल्पं
समर्पयामि माधव॥4॥

जनार्दना,  तुझ्यावर राग लोभ करतो. हे माधवा, तुला कधी मौन तर कधी बडबड समर्पित करतो.

नीलवर्णं करे चक्रं
चतुर्भुजं नरोत्तमम्।
कृष्णचन्द्रं मुखे हासं
वन्दे मानसहंसकम्॥5॥

नीलवर्ण, हाती चक्र, चतुर्भुज, पुरुषोत्तम, मुखी हास्य अशा मानसीच्या हंसाला, श्रीकृष्णचंद्राला मी वंदन करतो.

इति चन्द्रहासविरचितं श्रीकृष्णपञ्चकम्।
जयतु श्रीकृष्णः॥

Saturday, December 13, 2014

Sant Rangnath Maharaj Punyatithi Pravchan by Dr. Chandrhas Shastri

अदर्शने तिष्ठति रूपमस्य
पश्यन्ति चैनं सुसमिध्दसत्त्वाः।
हीनो मनीषी मनसा पश्ये-
द्यैनं विदुरमृतास्ते भवन्ति॥
महाभारत, सनत् सुजात-
धृतराष्ट्र संवाद
संजयादि सर्वांच्या शिष्टाया व्यर्थ गेल्या. धृतराष्ट्राचे मन व्यथित झाले. विदुराने नीतीचा उपदेश केला. आणि आध्यात्मिक उपदेशासाठी भगवान सनत् सुजातांना बोलावण्यात आले. तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला मोक्ष,मृत्युविज्ञान , भगवत् स्वरूप आदि विषयांवर मार्गदर्शन केले.
ज्यांचे अन्तःकरण निर्मल आहे तेच भगवद् स्वरूपाचे दर्शन करू शकतात. अन्तःकरण विशुध्द होण्यासाठी उपासना व गुरुकृपा आवश्यक आहे. नित्य नैमित्तिक कर्म केल्याने चित्तशुध्दी होते. कुळाचार बुडवून मुक्त होता येत नाही. म्हणून निरीहपणे कर्म करणे आवश्यक आहे.

Friday, December 12, 2014

Bhawtgeeta and Vedanta: A story by Dr. Chandrhas Shastri

A story on Bhagwatgeeta and Vedanta.
         Once a student was asked by his mentor,"Are you happy?"Student replied "No but I want to be happy."The mentor said, "read and think about stanzas in Geeta daily."After few days, again the mentor asked"Are you happy?"The student replied "I am enjoying."The mentor said, "you may continue your program of reading and thinking the Geeta."After few days, the mentor asked, "How are you and your situation now?"The student replied," Here, nothing is mine. Myself nothibg but joy and truth. Yes I am the Brahm."The mentor replied "Now you may give your scholar to others. You got what you should."Jsk!!!
By
Dr. Chandrhas Sonpethkar

Wednesday, December 10, 2014

Shreemat Shankaracharya Vandanam by Dr. Chandrahas Shastri

॥ दुर्गादासतनयचन्द्रहासविरचितं
   श्रीमच्छङ्कराचार्यवन्दनम्॥

नमोस्तु भगवन् तुभ्य माचार्यकुलभूषणम्।
जगद्गुरुं नमामीशं त्वां सदाशिवरूपिणम् ॥1॥

मोक्षमार्गस्त्वया मुक्तरद्वैतज्ञानमन्दिरे।
सूत्रं ब्रुतं त्वया यच्च ऋतं श्रेयस्करं नृणाम् ॥2॥

हस्तामलकवन्मोक्षः जीवब्रह्मैक्यतत्त्वतः।
स्तोत्ररचनया देव विश्वमुपकृतं त्वया ॥3॥

त्वं हि राष्ट्रस्य नेतृत्वं निरीहत्वेन भूषितम्।
धर्मसंस्थापने मन्ये ते कार्यं भवतारकम् ॥4॥

शं करोतीति कल्याणं यथार्था हि कलावपि।
अज्ञानतमसं नष्ट्वा ज्ञानं प्रकाशितं त्वया ॥5॥

स्तोत्रमुपनिषद्भाष्यं सूत्रं स्मृतिं च लेखनम्।
विपुलं ते कृतं कार्य मल्पकालेऽवनीतले ॥6॥

विजयश्रीं हि शास्त्रार्थे पारमार्थिकहेतवे।
शारदामन्दिरस्यापि द्वारमुद्घाटितं त्वया ॥7॥

पादरजं ललाटे मे विलसतु सुखेन वै।
इत्येव प्रार्थनां कृत्वा नमामि विरमामि च ॥8॥

इति चन्द्रहासविरचितं श्रीमच्छङ्कराचार्यवन्दनम्॥

Tuesday, December 9, 2014

॥चन्द्रहासविरचितश्रीगणेशाष्टकम्॥

अथ चन्द्रहासविरचितं श्रीगणेशाष्टकम्।

श्रीगणेशो वरं दाता
विघ्नहर्ता स्वभावतः।
पार्वतीश्वरयोः पुत्रः
पातु मां सर्वतोपरि॥1॥

खलनिर्दालकः साक्षात्
महादेवसुतः प्रभुः।
इतः ऋध्दिः ततः सिध्दिः
राराजते गणेश्वरः॥2॥

मेधानामीश्वरस्यास्य
ॐकाररूपमद्वयम्।
विद्यां ददाति सर्वेभ्यः
स जयति महेशजः॥3॥

कुमारस्यानुजोऽयं हि
शोभते मूषकोपरि।
यः प्रार्थयति यद्यद्धि
तस्मै यच्छति सर्वदः॥4॥

अकारणं दयालुत्वं
कृपालुत्वं स्वभावजम्।
परमपूजनीयोऽयं
पातु नः सर्वतोपरि॥5॥

अद्भूतमहिमाऽस्यास्ति
वर्णये किमहं कथम्।
गायन्ति यत्र सर्वे
द्युलोकस्थाः स्तवं स्वयं॥6॥

स्तुत्वा नत्वा जनाः यान्ति
कुशलतां प्रवीणताम्।
मोरया मोरया घोषं
कृत्वा धन्याः भवन्ति हि ॥7॥

मुनीनां वचनं सत्यं
कलौ चण्डिविनायकौ।
हासः नमति तं देवं सर्वविघ्नोपशान्तये॥8॥

Dr. Chandrhas Shastri

ShreeDurga-Dhyan-Panchakam

॥दुर्गादासतनयविरचितं
श्रीदुर्गाध्यानपञ्चकम्॥

ध्वनिं संश्रुत्य धन्योऽहं किणकिणकिणाङ्किण।          कङ्कणानां जनन्यास्तेऽभयमुद्रा धृता यदा॥1॥

श्रीचिह्नाङ्कितहस्तस्य दर्शनं पुण्यदं महत्।
निर्मलं मङ्गलं शुध्दं चेतश्चकासते खलु॥2॥

प्राप्यमन्यत्तदाऽशेषं भुक्तिं मुक्तिं भगं तथा।
त्रिषु कालेषु सत्यं त्वद्भक्तेन प्राप्यतेऽधिकम्॥3॥

वत्सलता स्वभावस्त्वदनाथेषु दया तथा।
चन्द्रहासप्रहारश्च मत्तेषु दुर्जनेषु च॥4॥

तस्मात् ध्यायेत् सदा दुर्गां स्वस्तिं स्वाहां स्वधामपि ।
श्रीचरणाम्बुजध्यानं सर्वानन्दप्रदं सुखम्॥5॥

इति दुर्गादासतनयविरचितं श्रीदुर्गाध्यानपञ्चकम्।

Saturday, December 6, 2014

चन्द्रहासविरचितश्रमशक्तिमहिमा॥

भावानामापणः मास्तु
तत्तः प्राप्तं यशस्त्याज्यम्।
वीरो भवतु शूरश्च
यशः यत्नेन भावयेत्॥1॥
भावनांचा बाजार नको. त्यातून मिळणारे यश नको. शूर वीर होवून प्रयत्नाने यश मिळवावे.
यद्यशरन्यमार्गेण
प्राप्तं तद् क्षयकारणम्।
हरन्ति मूषकाः धान्यं
पुष्टास्ते सर्पभोजनम्॥2॥
प्रयत्नाशिवाय चोरी वा इतर मार्गाने प्राप्त यश नाशाचे कारण होते जसे उंदिर धान्याचे हरण करतात आणि त्या पुष्ट उंदरांना साप खातो.
अक्षययशसे तत्र
ऋते सत्यान्न साधनम्।
श्रमे यत्ने रताः सर्वे
प्राप्नुवन्ति वरेण्यता॥3॥
अक्षय यशासाठी सत्यच साधन आहे. श्रम व प्रयत्नात रत असलेले सर्व लोक श्रेष्ठता प्राप्त करतात.
यद्यपि कठिणः मार्ग-
रग्रे सुखं करोति नः।
भिक्षां माचर हिंसां च
श्रमे वसति सिध्दता॥4॥
मार्ग कठीण आहे पण शेवटी सुखकारक आहे. भिक्षा वा हिंसा करू नकोस. श्रमात सिध्दतेचा निवास आहे.
श्रमेण  बुध्दियुक्तेन
दीनाः राज्ञः भवन्ति ते।
नित्य कार्ये रतः नास्ति
शषकस्य सहोदरः॥5॥
श्रम व बुध्दीच्या बलावर रंक राजे होतात. जो सदैव कार्यरत असतो तो सशाचा भाऊ नसतो. ( म्हणजे सशाप्रमाणे पराभूत होत नाही.)
सिंहः न मन्यते भाग्यं न रोदनं न याचनाम्।
त्यक्त्वाऽलस्यं वनं गच्छन्  अन्नं युज्नाति सः॥6॥

रडणे, मागणे, नशीब यांना सिंह साधन मानत नाही. तो आळस टाकून वनात जाऊन अन्न मिळवितो.
भगवद्वचनं श्रेष्ठं
योगः कर्मसु कौशलम्।
निरन्तरप्रयत्नात् प्राप्यं
कौशलमिति नान्यथा॥7॥
हे श्रेष्ठ भगवत् वचन आहे की, योग म्हणजे कर्मातील कौशल्य. कौशल्य केवळ सरावाने प्राप्त होते.
समनुचरिता प्रोक्ता
गाथा यशस्विनी सदा।
यत्नधिः श्रमशक्तिश्च
चन्द्रहासेन वंदिता॥8॥
ही गोष्ट यशस्वी लोकांनी आचरिलेली सांगितलेली यशस्विनी अशी आहे. प्रयत्नबुध्दि व श्रमशक्तीस चंद्रहास वंदन करतो.
जय श्रीकृष्ण!!!

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...