Wednesday, December 17, 2014

चन्द्रहासविरचित-परावलम्बित्वनिषेधः।

चन्द्रहासविरचित-परावलम्बित्वनिषेधः।

दयार्हास्तेजनास्तत्र
ये परेष्ववलम्बिताः।
नास्ति मार्गोदयस्तेषां
चतुष्कोणे स्थिताः सदा॥1॥

जे परावलंबी लोक असतात, ते दयनीय असतात. नेहमी चौकात थांबतात पण त्यांना मार्ग काही सापडत नाही.

कुतः कुत्र च गन्तव्यं
कथं च ज्ञायते न तैः।
स्वप्नावस्थासु जीवन्ति
यथार्थे जल्पने रताः॥2॥

कोठून कोठे कसे जायचे हे त्यांच्याकडून जाणले जात नाही. ते स्वप्नात जगतात आणि वास्तवात व्यर्थ बडबडीत मग्न असतात.

जनाः प्रतीक्षमाणास्ते
न लभन्ते सुखं परम्।
उपदिष्टुं हितं कर्तुं
कोऽत्र समर्थ्यते वद॥3॥

अशा त्या वाट पाहणा-या लोकांना सुख मात्र लाभत नाही. अशा लोकांना उपदेश करण्यास त्यांचे हित करण्यास येथे कोण बरे समर्थ ठरते; सांग.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...