Saturday, December 6, 2014

चन्द्रहासविरचितश्रमशक्तिमहिमा॥

भावानामापणः मास्तु
तत्तः प्राप्तं यशस्त्याज्यम्।
वीरो भवतु शूरश्च
यशः यत्नेन भावयेत्॥1॥
भावनांचा बाजार नको. त्यातून मिळणारे यश नको. शूर वीर होवून प्रयत्नाने यश मिळवावे.
यद्यशरन्यमार्गेण
प्राप्तं तद् क्षयकारणम्।
हरन्ति मूषकाः धान्यं
पुष्टास्ते सर्पभोजनम्॥2॥
प्रयत्नाशिवाय चोरी वा इतर मार्गाने प्राप्त यश नाशाचे कारण होते जसे उंदिर धान्याचे हरण करतात आणि त्या पुष्ट उंदरांना साप खातो.
अक्षययशसे तत्र
ऋते सत्यान्न साधनम्।
श्रमे यत्ने रताः सर्वे
प्राप्नुवन्ति वरेण्यता॥3॥
अक्षय यशासाठी सत्यच साधन आहे. श्रम व प्रयत्नात रत असलेले सर्व लोक श्रेष्ठता प्राप्त करतात.
यद्यपि कठिणः मार्ग-
रग्रे सुखं करोति नः।
भिक्षां माचर हिंसां च
श्रमे वसति सिध्दता॥4॥
मार्ग कठीण आहे पण शेवटी सुखकारक आहे. भिक्षा वा हिंसा करू नकोस. श्रमात सिध्दतेचा निवास आहे.
श्रमेण  बुध्दियुक्तेन
दीनाः राज्ञः भवन्ति ते।
नित्य कार्ये रतः नास्ति
शषकस्य सहोदरः॥5॥
श्रम व बुध्दीच्या बलावर रंक राजे होतात. जो सदैव कार्यरत असतो तो सशाचा भाऊ नसतो. ( म्हणजे सशाप्रमाणे पराभूत होत नाही.)
सिंहः न मन्यते भाग्यं न रोदनं न याचनाम्।
त्यक्त्वाऽलस्यं वनं गच्छन्  अन्नं युज्नाति सः॥6॥

रडणे, मागणे, नशीब यांना सिंह साधन मानत नाही. तो आळस टाकून वनात जाऊन अन्न मिळवितो.
भगवद्वचनं श्रेष्ठं
योगः कर्मसु कौशलम्।
निरन्तरप्रयत्नात् प्राप्यं
कौशलमिति नान्यथा॥7॥
हे श्रेष्ठ भगवत् वचन आहे की, योग म्हणजे कर्मातील कौशल्य. कौशल्य केवळ सरावाने प्राप्त होते.
समनुचरिता प्रोक्ता
गाथा यशस्विनी सदा।
यत्नधिः श्रमशक्तिश्च
चन्द्रहासेन वंदिता॥8॥
ही गोष्ट यशस्वी लोकांनी आचरिलेली सांगितलेली यशस्विनी अशी आहे. प्रयत्नबुध्दि व श्रमशक्तीस चंद्रहास वंदन करतो.
जय श्रीकृष्ण!!!

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...