Soundness of mind.
By- Dr. Chandrhas Shastri.
मनो हि व्यापकं यस्य
न्यूनाः प्रश्नाः भवन्ति नु।
तस्मात् यतस्व चित्तस्य
विस्तारार्थं सदा सदा॥1॥
ज्याचे मन मोठे, त्याचे प्रश्न कमी होतात. म्हणून चित्ताच्या विस्तारासाठी प्रयत्न कर.
यत्र व्यापकता तत्र
स्वयमायाति शुद्धता । शुद्धतामनुधावेद्धि
स्वयमेव पवित्रता॥2॥
जेथे व्यापकता तेथे शुद्धता, शुद्धता तेथे पवित्रता अनुधावन करतात.
सुखमायाति तत्रैव
नित्यं वसति मानव।
सुखस्यानु च मा धाव वरेण्यमेकमाधवम्॥3॥
सुख तेथेच येते आणि नित्य राहते. पण तू सुखाच्या मागे धावू नकोस. माधवाला वर.
मनसो धवलत्वं हि
माधवः खलु मानव।
अभ्यलंकुरुतः चित्तं
मधुरता च चारुता॥4॥
हे मानवा, मनाचे विशुद्धत्व म्हणजे माधव. मधुरता आणि चारुता मनाला अलंकृत करतात.
सुस्पष्टता विचारस्य चारुतेत्यभिधीयते।
नैष्ठिकता विचारस्य
मधुमाधूर्यमुच्यते ॥5॥
विचाराची सुस्पष्टता म्हणजे सौन्दर्य. विचारांचे एकनिष्ठत्व हेच मधाचे माधूर्य (अत्यधिक मधुरता) होय.
JSK!!!