Friday, February 27, 2015

Dr. Chandrhas shastri talks with the sea.

नमः सागराय।
- डाॅ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर

किमर्थं त्वमुच्छृङ्खलो जायसे रे
न तोयं त्वदीयं न भूमिस्त्वदीया।
तवेदं हि कार्यं नृणामेव साम्यं
त्वया त्याज्यमेतद्धि रत्नाकरोऽसि ॥1॥

अरे तू रत्नाकर आहेस. तू उच्छृंखल का बरे होतोस? ना पाणी तुझे ना जमीन तुझी. तुझे हे माणसांशी साम्य असलेले कार्य आहे; तू हे त्यागले पाहीजेस.

क्षणार्थं हि शान्तो न कुत्रापि तिष्ठन्
निनादं कुरूषे प्रवातस्य सख्यम्।
तडागः सुपेयेन तोयेन शोभन्
वद त्वं कदा सः करोतीति शब्दम् ॥2॥

क्षणासाठीही कोठे सुद्धा शांत थांबत नाहीस.  वयुच्या सहाय्याने आवाज करतोस. सुपेत जलाने शोभणारे सरोवर सांग कधी आवाज करते?

कथं नैव कुप्ये वद त्वं च मित्र
प्रहिंसां परीक्ष्य त्वदीये च तीरे।
त्वदीयाश्रितानां न रक्षां कुरूषे
त्वया कार्यमेतद् प्रमादं विनात्र ॥3॥

तुझ्या तीरावरील हिंसा पाहून मित्रा, मी तुझ्यावर कसे रागावू नको सांग.

त्वया रक्षणीया हि मीनादयस्ते
त्वया पालनीया हि कर्कादयस्ते।
त्वमेको हि तेषां पिता पालनाय
त्वया त्याज्यमेतां स्थितिं दर्शकस्य ॥4॥

मीनादि सर्वांचे रक्षण तू करावेस. कर्कादि सर्वांचे पालन तू करावेस. तू त्यांचा पालक पिता आहेस. तू ही दर्शकाची स्थिती सोडून द्यावीस.

सुलोकाभिवन्द्यो रमायाः पिता त्वं
सुपूज्यश्च जातो रमेशस्य वासात् ।
मुनेः कारणादेव रक्षाभिजाता
तदर्थं हि तुभ्यं नमः सागराय ॥5॥

तू सुजनवंद्य आहेस. लक्ष्मीचा पिता तू आहेस. रमेशाच्या निवासामुळे तू पूज्य झालास. (अगस्त्य मुनींमुळे) तुझे रक्षण झाले. त्यासाठी तुला सागराला नमस्कार असो.

Wednesday, February 4, 2015

Dr. S. Chandrhas writes on joyful life. त्वं भव मुदितः सदा।

Dr. S. Chandrhas writes on joyful life.

स्मृत्वा विस्मरणीयानि
मा भव पीडितः कदा।
स्मृत्वा संस्मरणीयानि
त्वं भव मुदितः सदा॥

विस्मरणीयाचे स्मरण करून दुःखी होवू नकोस. संस्मरणीयाचे स्मरण करून तू नेहमी आनंदित हो.

अद्यतनदिनं त्वं वै
जितं तर्हि सुखेन ते।
गच्छति जीवनं मित्र
चिन्तां कुरुष्व मा कदा॥

तुझा आजचा दिवस तू जिंकलास, तर मित्रा, जीवन सुखात जाईल. कधीही चिंता करू नकोस.

त्वदीयं मानसं सुहृद्
पालनीयं त्वयैव हि।
नान्यत् कोऽपि कदाऽयाति
लिखित्वा स्थापयस्व च॥

मित्रा, तुझे मन तुलाच सांभाळावयाचे आहे. त्यासाठी अन्य कोणी येणार नाही; हे तू लिहून ठेव.

Monday, February 2, 2015

Dr. S. Chandrhas writes on Ahamkarnishedh:

अहंकारनिषेधः।
॥चन्द्रहासः॥

यावज्जीवत्यहङ्कारो
तावन्नरो न जीवति।
प्रार्थितुं शक्यते नैव
भगवन्तं कदापि च॥1॥

जो पर्यंत अहंकार जीवंत आहे; तो पर्यंत माणूस जीवंत नसतो. भगवंताला प्रार्थना करणेही शक्य होत नाही.

न सिद्ध्यते शरण्यत्वं
न ध्यानं न हि चिन्तनम्।
द्रष्टव्यः सर्वतो यः तं
नैव पश्यति सः कदा॥2॥

शरण्यता, ध्यान व चिंतन साधत नाही. ज्याला सर्वत्र पहावयाचे, त्याला कधी पाहत नाही.

न ज्ञानं नैव दानं च
भक्तिरपि न सिद्ध्यते।
समर्पयति कालाय
स्वं स्वयमेव सः खलु॥3॥

ज्ञान, दान व भक्तीही साधत नाही. स्वतःच स्वतःस कालास अर्पण करतो.

तस्मात् त्याज्यस्त्वया सुहृद् अहङ्कारो भयङ्करः।
दृष्ट्वा तौ चरणौ मातुः
नतो भव नतो भव॥4॥

हे मित्रा, म्हणून या भयंकर अशा अहंकाराचा तू त्याग कर. आणि मातेचे चरण पाहून विनम्र हो. विनम्र हो.

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...