ध्येयनिश्चितिः।
॥चन्द्रहासः॥
भवतु निश्चितं लक्ष्यं
प्रत्येकस्य सुखेन हि।
समीपस्थो न वीक्ष्यः
न चाप्तोऽपि तथैव च॥
प्रत्येकाचे ध्येय त्याच्या सुखाने निश्चित व्हावे. जवळच्या किंवा नातेवाईकाला पाहून ध्येय निश्चित करू नये.
ध्येयं सुनिश्चितव्यं तु
परीक्ष्य सर्वथा निजम्।
आकाङ्क्षा महती चास्तु
वर्जयेदति सर्वथा॥
म्हणून सर्व त-हेने स्वतःला पारखून चांगल्या प्रकारे ध्येय निश्चित करावे. आकांक्षा मोठी असावी; अति नको.
बाह्यबलेन किञ्चिद्धि
न च कार्यं कदाचन।
स्वान्तः सुखाय सर्वं हि
करणीयं नृणा सदा॥
कधीही बाह्य बलाने कार्य करू नये. स्वान्तः सुखाय असे सर्व काही माणसाने करावे.
न जन्मना न वंशेन
कस्याग्रहेण वापि न।
केवलं क्षमताऽधारे
ध्येयस्य चयनं भवेत्॥
जन्म, वंश, कोणाचा आग्रह या आधारे नव्हे; तर केवऴ आपल्या क्षमतांच्या आधारे ध्येयाची निवड व्हावी.