वैशाखाचे तापते ऊन. दुपारचे दोनेक वाजलेले. जेवण राहीलेले. तरीही त्या उन्हाचा पारा जाणवत नाही, जेव्हा आपल्या मनाचा जणु आरसा; अशा मित्राचा अचानक संपर्क होतो.
ग्रीष्मातपेऽपि वैशाखे
सुखं शक्यं मतं मम।
श्रीदेवीकृपया किं न
लभते सुजनो वद॥1॥
ग्रीष्माच्या वैशाख वणव्यातही सुख लाभणे शक्य आहे; असे माझे मत आहे. श्रीदेवीकृपेने सुजनाला काय लाभत नाही, सांगा.
कर्णाभ्यां श्रूयते वाणी
जाने ह्योषधरूपिणी।
आह्लादिनी मनोज्ञा च
स्मारयन्ती कृपां मतेः॥2॥
कान औषधीसम अशा वाणीला ऐकतात. आह्लादकारी, मन जाणणारी अशी वाणी सरस्वतीच्या कृपेचे स्मरण करून देते.
दूरत्वेनाप्यदूरत्वं
मित्रस्य लक्षणं महत्।
तत्र च क्षेमचिन्ता या
पताका सुहृदः परा॥3॥
दूर असूनही समीपता हे मित्राचे मोठे लक्षण आहे. आणि तेथे जी कुशलचिंता; ती तर मित्राची जणु पताकाच!
मुकं स्थित्वापि कम्पन्ती
चित्तजवनिका तथा।
यथा विहाय नादं सा
पताका कम्पतीह वै॥4॥
जसे नादा विना पताका हलते, तसे मौन राहूनही चित्त पटल कंपित होते.
धन्योऽस्मि ते कृपां प्राप्य
चास्मिन् जन्मनि मातृके।
जन्मान्तरेऽपि दासं मां
न विस्मरतु रेणुके॥
हे माते, या जन्मात तुझी कृपा प्राप्त होवून मी धन्य झालो. हे रेणुके, पुढच्या जन्मीही मला दासाला विसरू नकोस.
No comments:
Post a Comment