संरचनं तथापि च।
॥चन्द्रहासः॥
सुलभं निन्दनं लोके
तस्मादप्युपदेशनम्।
दुर्लभं तु सहाय्यं च
संरचनं तथापि च॥
निंदा करणे सुलभ. त्याहून उपदेश करणे सुलभ. सहाय्य दुर्लभ त्याहून संरचन म्हणजे सृजन दुर्लभ.
निन्दनाल्लभ्यते ख्यातिः
व्यर्था निरुपयोगिनी।
विहाय कर्मणाऽदेशः
शवशृङ्गारवद्धि सः॥
निंदा करून मिळालेली प्रसिद्धी व्यर्थ व निरुपयोगी असते. कृतीविना उपदेश म्हणजे जणु प्रेताचा शृंगार.
आवश्यकं यथाशक्यं
संरचनं च संहतिः।
ततः हेतुर्भवेत् सिद्धः
पूर्णं भवेन्मनोरथम्॥
यथा शक्य संरचन व संघटन आवश्यक आहे. तरच हेतु सिद्ध होईल आणि मनोरथ पूर्ण होईल.
No comments:
Post a Comment