Tuesday, April 27, 2021

शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

 

शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।
चन्द्रहासः।

मनोहारिणी चापि दिव्या त्वमीशे
शिवे मातृके कल्पवल्ली त्वमीशे।
प्रतीक्षां कृपायास्तु कुर्वन् स्थितोऽहं
शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

जगत्पालिके रेणुके मातृके त्वं
सुतानां हितार्थं सुमग्ने भवानि।
हितं मे जयं मेऽस्तु मातः सदा हि
शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

शरण्ये प्रभे दुर्जनान्तस्य कार्यं
प्रसिद्धं च सिद्धं सदा ते भवानि।
तमो नाशयित्वा प्रकाशं कुरु त्वं
शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

विहाय त्वयाऽस्ते शरण्यं किमन्यत्
त्वमेवासि सर्वं शिवे मे सदा हि।
यशो देहि मातः यशो देहि मातः
शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

अलं मे भ्रमं विभ्रमं हे विशाले
शरण्यं च भुत्वा शुभे पादयोस्ते।
ध्रुवस्थानमेतद्धि देयं च मह्यं
शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

अनन्यं च भावं सदाऽस्तां मदीयं
विशालाक्षि दक्षे सुभक्तैश्च वन्द्ये।
नमः खड्गहस्ते नमस्ते नमस्ते
शुभे रेणुके त्राहि मां पाहि मां त्वम्।।

आशीषा नैव दीयन्ते।

 

आशीषा नैव दीयन्ते।
©
चन्द्रहासः।

आशीषा नैव दीयन्ते
प्राप्यन्ते एव सर्वथा।
सत्कार्येषु रतैर्लोकैः
प्राप्यास्ते सहजं तथा॥1॥
आशीर्वाद दिले जात नाहीत, ते मिळविले जातात. सत्कार्यात रत असणा-या लोकांकडून आशीर्वाद सहज मिळविले जातात.

तोयं जलधराणां च
पादपानां फलं तथा।
सज्जनानां वचश्चापि
सहजं सकलं किल॥2॥
मेघांचे पाणी बरसणे, झाडांचे फलित होणे आणि सज्जनांचे आशीर्वचन हे सर्व स्वाभाविक असते.

कियत् तोयं तु मेघानां
वृक्षफलानि वा जनैः।
आशीषाः सज्जनानां च
पात्रे हि प्राप्तिहेतुता॥3॥
लोकांनी मेघांचे पाणी, झाडाची फळे आणि सज्जनांचे आशीर्वाद किती मिळवावेत या संदर्भात 'पात्र' महत्वाचे ठरते.

सत्पात्रेण हि चाप्यन्ते
सर्वाणि वाञ्छितानि वै।
तोयं फलं वचश्चापि
न तत्र संशयः प्रिय॥4॥
हे प्रिय, सर्व वांछित पदार्थ अर्थात पाणी, फळ आणि आशीर्वाद सत्पात्राद्वारेच प्राप्त केले जातात, यात काही संशय नाही.

तस्मात् यतस्व मे मित्र
सत्पात्रप्राप्तिहेतवे।
सत्पात्रं भव च त्वं रे
सकलहितहेतवे॥5॥
म्हणून माझ्या मित्रा, योग्य पात्राच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. आणि सर्व प्रकारच्या हितासाठी तूच सत्पात्र हो.

सत्यमनुसर त्वं च
सत्यं ब्रूहि तथा चर।
सम्यक् विचार्य कर्तव्यं
त्वया मित्र सदा सदा॥6॥
हे मित्रा (सत्पात्र होण्यासाठी) तू सत्याचे अनुसरण कर. सत्य बोल आणि तसे वाग. सम्यक् विचार करून तू नेहमी कार्य कर.

वन्देऽहं देवकीसुतम्।

 

वन्देऽहं देवकीसुतम्।
©
चन्द्रहासः।

प्रमोदमोदरूपं त्वां
वन्देऽहं देवकीसुतम्।
यशोदावत्सलं वन्दे
वसुदेवसुतं प्रभुम्॥

नन्दानन्दमुकुन्दं त्वां
गोकुलवासिनं विभुम्।
गोप्रतिपालकं वन्दे
गोकुलजनवल्लभम्॥

नमामि त्वां नमामि त्वां
चित्तप्रशान्तकारकम्।
मुरलीं वादयन्तं त्वां
मधुरं मधुरं परम्॥

यमुनाधिपतिं वन्दे
त्वां नवनीतहारकम्।
बलरामानुजं वन्दे
वन्दे वसनहारकम्॥

श्रीराधिकाप्रियं त्वां
वन्दे मधुरभाषिणम्।
श्रीराधासहितं वन्दे
त्वां मनोहररूपिणम्॥

तव जन्मतिथौ भूतं
स्मरणं कृपया तव।
नमति चन्द्रहासोऽयं
त्वां भगवन् पुनः पुनः॥

गुणग्राहकेषु प्रथम: डॉ. संजय-मालपाणी- महोदय:! (भाग १)

 

गुणग्राहकेषु प्रथम: डॉ. संजय-मालपाणी- महोदय:! (भाग १)

- डाॅ. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर

मागच्या महिन्यातील गोष्ट. संस्कृतविषयी नितांत श्रद्धा, अचल निष्ठा आणि अपार अनुराग असलेल्या एका व्यक्तिमत्वाशी भेट झाली. किती मिनिटांची ही भेट होती? तर फक्त १० मिनिटांची. ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. संजय मालपाणी, एक बडं प्रस्थ. पण अत्यंत विनम्र व्यक्तित्व. (दि. २८ ऑगस्ट २०१८)

          निमित्त होते, डॉ. संजय भाऊ  कार्याध्यक्ष आहेत, त्या संस्थेच्या संगमनेर येथील बी. एड. महाविद्यालयातील मुलाखतीचे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार मुलाखती घेण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. उमेदवार आले. मुलाखती सुरु झाल्या. आणि मी संस्कृत विषयक एकेक प्रश्न विचारत होतो.  डॉ. संजय भाऊ लक्ष देऊन ऐकत होते. नंतर डॉ. संजय भाऊंसोबत संस्कृत विषयक मुद्द्यांची चर्चा झाली. मी त्यांना माझे कार्ड दिले. त्यांनी मला त्यांचे कार्ड दिले. फार काही बोलणे झाले नाही. आम्ही पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालो. 

          संध्याकाळचे सहा वाजले असतील. डॉ. संजय भाऊंचा संदेश मोबाइलवर आला. तो संदेश खालील प्रमाणे,
"
आदरणीय सर, आपल्याला भेटून आज अत्यंत आनंल झाला. आपल्यासारखे संस्कृतचे विद्वान समाजाची श्रीमंती आणि गौरव वाढविणारे आहेत. आपणाशी आज अधिक बोलणे झाले नाही. परत कधीतरी नक्की भेटू.
संजय मालपाणी"

मीही त्यांना प्रतिसादासाठी संदेश पाठवला: 
"
आदरणीय महोदय, नमो नमः। आपल्या संस्कृत आणि संस्कृतीविषयक प्रेमाबद्दल खूप ऐकले होते. आज प्रत्यक्ष अनुभवता आले. नक्की भेटू या. जय श्रीकृष्ण!
चन्द्रहास-सोनपेठकरः।"

समत्वं योगमुच्यते अशी स्थिती मी अनुभवत होतो. 

त्यांनतर दोन ते तीन दिवसातच संगमनेर कला विज्ञान महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक सरांचा मला फोन आला. आदरणीय डॉ. संजय भाऊंनी मला व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. संगमनेर कला विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित संस्कृत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित संस्कृत संमेलन व कृतिसत्र यासाठी उदघाटक आणि प्रमुख वक्ता म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. मी होकार कळवला. 

आणि मला प्रश्न पडला? 

वर्षभर मी कुठे ना कुठे व्याख्यान इत्यादी कार्यक्रमांना जातच असतो. पण या निमंत्रणाने मी इतका सुखावलो कसा गेलो? मी एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती घेत होतो. याचे कारण डॉ. संजय भाऊंची गुणग्राहकता आणि त्यांचे संस्कृत विषयीचे निरतिशय प्रेम. १८ अध्याय गीता मुखोद्गत करणारं हे व्यक्तिमत्व. ज्ञानार्थी व्यक्तित्व. त्यांचा अधिकार, त्यांचा अनुभव खूप समृद्ध. पण 

बाल्यादपि सुभाषितं ग्राह्यम्।

या उक्तीप्रमाणे ते मला सन्मान देत होते. नंतर वाटलं, हा सन्मान माझा नाही. माझा त्यावर अधिकारही नाही. हा सन्मान संस्कृतचा. 

डॉ. संजय भाऊंसारखा संस्कृतवर नितांत प्रेम करणारा माणूस विरळा! इतकं मात्र निश्चित, 

तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले।
यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवं ध्रुवा॥
अर्थात जो पर्यंत या भूमीवर आर्यांचा वंश आहे, तोपर्यंत ही देवभाषा संस्कृतरूपी देवी या भूमीवर अढळ राहणार आहे.

ही अनुभूती आपल्याला डॉ. संजय भाऊंसोबत असताना नक्की येते. 
"
गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति।"
गुणज्ञ माणसाजवळ आपण गेलं की, आपले गुण वाढतात. आदरणीय डाॅ. संजय भाऊंच्या शब्दसुमनांस पात्र ठरण्यासाठी भगवती शारदामातेने मजवर कृपा करावी, ही तिच्या चरणी प्रार्थना.
गुणग्राहकजनांमध्ये अग्रगण्य अशा डाॅ. संजय भाऊंकडून संस्कृत शारदेची अखंड सेवा घडावी, ही भगवती शारदांबेच्या चरणी प्रार्थना.

संस्कृत संमेलनासाठी मी गेलो. तेथील अनुभव, डॉ. संजय भाऊंद्वारे संचलित ध्रुव अकादमीस भेट या विषयीचे अनुभव कथन पुढील ब्लॉगमध्ये...... 

जय श्रीकृष्ण! 

।।श्रीअष्टभुजाऽष्टकम्।।

 

।।श्रीअष्टभुजाऽष्टकम्।।

 © दुर्गादासतनयः।

ध्यानम् 

ध्यायेत् त्रिनयनामुग्रां दुर्गां शत्रुविनाशिनीम्।

 परशुधारिणीं ध्यायेत् बाधाऽरिष्टान्तहेतवे ।।

स्तुतिः

 तेजस्विनि नमस्तुभ्यं तेजोनिधि नमो नमः।

 प्रचण्डखड्गधारिण्यै चण्डिकायै नमोस्तुते ।।१।।

 खड्गहस्ते गदाहस्ते पाशहस्ते धनुर्हस्ते ।

 बाणहस्ते विशालाक्षि वन्दे त्रिशुलधारिणीम्।।२।।

 शङ्खहस्ते नमस्तुभ्यं रिपुदलविनाशिनि।

 भयप्रलयकारिण्यै शत्रुध्वंसं करोतु नः।।३।।

नमस्तुभ्यं नमस्तुभ्यम् अट्टहाससमन्विते ।

 रुधिरप्राशिनीं वीराम् एकवीरां नमाम्यहम् ।।४।।

 विमुक्तकेशसम्भारे सिंहध्वजे नमो नमः ।

 कान्तिमत्यै प्रचण्डायै नमस्तुभ्यं नमोनमः ।।५।।

अष्टभुजाऽस्त्रशोभिन्यै महाकालेशभामिनि।

 नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं पादयुग्मे नता वयम् ।।६।।

 गच्छेद्दृष्टिश्च मे यत्र तत्र तेजो भयङ्करम् ।

 कोटिसूर्यसमं चण्डं खड्गस्य प्रतिभाति माम् ।।७।।

 त्रिनेत्रे देहि नो नित्यं सिद्धिर्जयस्तथा यशः ।

 नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं शत्रुध्वंसं करोतु नः ।।८।।

 फलश्रुतिः

शत्रुपीडान्तकं स्तोत्रं भगवत्या इदं पठेत् ।

लाभस्तस्य जयस्तस्य निश्चितो नात्र संशयः।

 

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...