आशीषा नैव दीयन्ते।
© चन्द्रहासः।
आशीषा नैव दीयन्ते
प्राप्यन्ते
एव सर्वथा।
सत्कार्येषु
रतैर्लोकैः
प्राप्यास्ते
सहजं तथा॥1॥
आशीर्वाद
दिले जात नाहीत, ते
मिळविले जातात. सत्कार्यात रत असणा-या लोकांकडून आशीर्वाद सहज मिळविले जातात.
तोयं जलधराणां च
पादपानां
फलं तथा।
सज्जनानां
वचश्चापि
सहजं सकलं
किल॥2॥
मेघांचे
पाणी बरसणे, झाडांचे
फलित होणे आणि सज्जनांचे आशीर्वचन हे सर्व स्वाभाविक असते.
कियत् तोयं तु मेघानां
वृक्षफलानि
वा जनैः।
आशीषाः
सज्जनानां च
पात्रे हि
प्राप्तिहेतुता॥3॥
लोकांनी
मेघांचे पाणी, झाडाची
फळे आणि सज्जनांचे आशीर्वाद किती मिळवावेत या संदर्भात 'पात्र'
महत्वाचे
ठरते.
सत्पात्रेण हि चाप्यन्ते
सर्वाणि
वाञ्छितानि वै।
तोयं फलं
वचश्चापि
न तत्र
संशयः प्रिय॥4॥
हे प्रिय, सर्व वांछित पदार्थ अर्थात पाणी, फळ आणि आशीर्वाद सत्पात्राद्वारेच
प्राप्त केले जातात, यात काही
संशय नाही.
तस्मात् यतस्व मे मित्र
सत्पात्रप्राप्तिहेतवे।
सत्पात्रं
भव च त्वं रे
सकलहितहेतवे॥5॥
म्हणून
माझ्या मित्रा, योग्य पात्राच्या
प्राप्तीसाठी प्रयत्न कर. आणि सर्व प्रकारच्या हितासाठी तूच सत्पात्र हो.
सत्यमनुसर त्वं च
सत्यं
ब्रूहि तथा चर।
सम्यक्
विचार्य कर्तव्यं
त्वया
मित्र सदा सदा॥6॥
हे मित्रा
(सत्पात्र होण्यासाठी) तू सत्याचे अनुसरण कर. सत्य बोल आणि तसे वाग. सम्यक् विचार करून
तू नेहमी कार्य कर.
No comments:
Post a Comment