कविचन्द्रहासविरचितं
काव्यं
भजन्ति वृत्तिभेदतः॥
नारायणं हि
पश्यन्ति
सर्ववस्तुषु केचन।
नारायणे हि पश्यन्ति
नरं च वृत्तिभेदतः॥
कोणी यच्चयावत्
(सजीवाजीव) सर्ववस्तुंमध्ये भगवंत पाहतात. तर कोणी भगवंतामध्येच माणसाला पाहतात (
भगवंत हा भगवंत नसून माणूस आहे; अशी कल्पना करतात.) हे स्वभावाच्या फरकाने घडून येते.
केचन शत्रुरूपेण
मित्ररूपेण केचन।
भजन्ति भगवन्तं तं
मन्येऽहं वृत्तिभेदतः॥
कोणी शत्रु म्हणून
(रावणादि) तर कोणी मित्र म्हणून (अर्जुनादि) भगवंताला भजतात; याचेही कारण स्वभाव असावे; असे मला वाटते.
वेदैस्तु वर्णितो
नेति
नैवेत्युक्त्वापि केचन।
स्वाभिप्रायं वदन्तीति
भजन्ति वृत्तिभेदतः॥
वेद त्याचे वर्णन
नेति म्हणजे "असा नाही", असे करतात. कोणी (चार्वाकादि) 'तो नाहीच' असे म्हणून आपला अभिप्राय बोलतात. लोक त्याला आपल्या
स्वभाववैविध्याप्रमाणे भजतात.
© डा. चन्द्रहास सोनपेठकर
( तार्कीक सहमती व असहमतीचे स्वागतासह
जय श्रीकृष्ण।)
No comments:
Post a Comment