Tuesday, April 27, 2021

देहि सहजतां मह्यम्।

 

देहि सहजतां मह्यम्।
© चन्द्रहासः।

 

सुप्रीता त्वं प्रसन्नासि यदि देवि ममोपरि।
देहि सहजतां मह्यम् इत्येव प्रार्थये खलु॥1

हे देवी, तू जर माझ्यावर प्रसन्न व सुप्रित आहेस; तर मला सहजता दे, अशीच प्रार्थना मी करतो. 

आसीना हृदि भूत्वा मे मातस्त्वं रेणुके स्वधे।
भक्तिस्ते सहजा नित्या भवेदिति च काङ्क्षये॥2

हे रेणुके माते स्वधे,तू माझ्या हृदयात आसनस्थ होऊन तुझी भक्ती माझ्यासाठी सहज नित्य व्हावी, अशी इच्छा मी करतो.  

मस्तिष्कासनरूपेण चाभ्यलंकृत्य शारदे।
विचाराः सहजाः सन्तु मातृके हंसवाहने॥3

 हे शारदे, हंसवाहने माते, माझे मस्तिष्क आसनरूपाने अलंकृत करून माझे विचार सहज असावेत असे तू करावेस. 

 

दातृत्वं सहजं मेऽस्तु कृपारूपे दयायुते।
गेहे मे ते रमे मातः नित्यनिवासकारणात्॥4

हे कृपारूपे, दयासहिते, रमे, माते, माझ्या घरी तुझ्या नित्य निवासामुळे माझे दातृत्व सहज व्हावे. 

इच्छाशक्तिस्त्वमेवाम्ब प्राणशक्तिस्तथैव च।
सर्वदा सर्वकार्येषु सहजताऽस्तु मे सदा॥5

हे अंबे, तूच इच्छाशक्ती तसेच प्राणशक्ती आहेस.  माझ्या सर्वकार्यात सर्वदा सहजता असावी. 

किञ्चिन्न कर्तुमर्होऽहं कृपां विना तवाम्बिके।
इत्यस्य स्मरणं मेऽस्तु सहजं जगदम्बिके॥6

हे अंबिके, जगदंबिके, तुझ्या कृपेविना काहीही करण्यास मी योग्य नाही, याचे मला सहज स्मरण असावे. 

तव खड्गस्य नाम्नो$स्य धृतदेहस्य रक्षणम्।
कल्याणं वर्धनं चापि विषयोऽयं तवास्ति वै॥7

तुझ्या खड्गाचे नाम धारण करणाऱ्या देहाचे रक्षण, कल्याण, वर्धन हा खरोखर तुझाच विषय आहे. 

{देवीच्या खड्गाचे नाम = चन्द्रहास}

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...