वाक्कौशलं जानीयात्।
© चन्द्रहासः।
अधमानां प्रवादे च
विवादे दुर्जनस्य वै।
संवादे सज्जनानां च
कालो गच्छति गच्छति।।१।।
अधमांचा काळ अफवा पसरविण्यात, दुर्जनांचा काळ भांडण्यात जातो. आणि
सज्जनांचा काळ संवादात जात असतो.
वार्ता$ल्पा$पि करोत्येव
सुखं श्रेष्ठं नृणां यदि।
जानीयात् सुजनं तं वै
सर्वोपकारणे क्षमः ।।२।।
ज्याच्याशी थोडे बोलणे सुद्धा
माणसांना श्रेष्ठसुखकारक असते, त्याला खरोखर उपकार करण्यास सक्षम असा भला माणूस जाणावे.
न जायते$र्थबोधस्तु
सुदीर्घं जल्पनं ततः ।
न तथा सुजनः खलु
नायाति व्यसने$पि सः।।३।।
खूप वेळ बडबड करूनही अर्थबोध होत नाही, तर तो खरोखर सज्जन नसतो. तो संकटातही
(सहाय्यास) येत नाही.
प्रकाशनाय सत्यस्य
चाल्पं भवति जल्पनम्।
आच्छादनाय चासत्यं
दीर्घं प्रलपनं किल।।४।।
खरं सांगण्यासाठी कमी बोलणं पुरे
होतं. खोटं लपविण्यासाठी अधिक बोलावं लागतं.
वाक्कौशलं
मनुष्यस्य
दर्पणमिव विद्यते न वा।
ज्ञायते येन तत्तस्य
हानिर्न्यूना हि जायते।।५।।
माणसाचे बोलण्याचे कौशल्य आरशासारखे
असते, नाही का? जो ते जाणतो, त्याची हानी कमी होते.
No comments:
Post a Comment