Tuesday, April 27, 2021

ऋणमेव सत्यम्।

 

ऋणमेव सत्यम्।
©
चन्द्रहासः।

ऋणमेव हि सत्यं तत्
विश्वेस्मिन् ज्ञेयमेव वै।
प्रतिदानं भवेत् दुःखे
नृणा तत् गृह्यते सुखे॥
या जगात ते कर्जच काय ते खरे आहे. असे खरोखर जाणले पाहीजे. दुःखात ते परत फेडले जाते आणि सुखात माणसाकडून ते घेतले जाते.

स्वीकारसमये लक्ष्यं
न लक्ष्यते तथापि तत्।
विस्मयकारकः सत्यं
नृस्वभावो हि सर्वथा॥
कर्ज घेताना तिकडे लक्ष दिले पाहीजे. पण लक्ष दिले जात नाही; हा माणसाचा स्वभाव सर्वप्रकारे आश्चर्यकारक आहे.

तस्मादृणात् कथं मुक्तिर्
वच्मि विचार्यते यदि।
स्मरेत् स्मरेत् सदैकं हि
भगवन्नाम केवलम्॥
त्या ऋणातून कसे मुक्त व्हावे, असे विचारले गेले, तर मी सांगतो की; सदैव सतत एक भगवंताचे नाम स्मरावे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...