यत्नफलम्।
© चन्द्रहासः।
सततं साधु कर्तव्यं
यत्नोऽपि सततं तथा।
लभते हि फलं श्रेष्ठं
तत्र न संशयः किल।।1॥
नेहमी चांगले काम करावे तसेच
प्रयत्नही करावा. त्यामुळे निश्चितच श्रेष्ठ फळ मिळते.
न त्यक्तव्यः प्रयत्नश्च
त्यक्ते यत्ने लभेत किम्।
नियमः सरलोऽयं वै
परिपालनाय सर्वथा।।2॥
प्रयत्नाचा त्याग करू नये, प्रयत्न सोडल्यास काय मिळेल? हा साधा नियम सर्वथा अंगीकारावा.
अदृष्ट्वाऽपि यथेष्टं तद्
गन्तव्यं प्रति गम्यते।
तथा प्रयत्नवेलायां
कठिणं सहजं हि तद्।।3॥
जसे प्रवासात जेथे जायचे आहे, ते स्थान दिसले नाही तरी तिकडे गमन
केले जाते; तसे प्रयत्न करताना कठिण
वाटणारे काम अंती सोपे होते.
संयमयत्नसंश्रद्धाः
नृणां विकासकारकाः।
तेषामाचरणादेव
लभते वाञ्छितं खलु।।4॥
संयम प्रयत्न आणि श्रद्धा माणसाचा
विकास घडवितात. त्यांच्या आचरणानेच जे हवे ते मिळते.
धीरप्रशान्तनृणाऽप्राप्यं
न किञ्चिदिह विद्यते।
हे देवि, रेणुके देहि
यत्नशक्तिं च धीरताम्।।5॥
धीरप्रशांत माणसास न मिळण्यासारखे
काही नाही. हे रेणुकादेवी, मला प्रयत्नशक्ती व धैर्य
दे.
सत्यं तु सारमेकं ते
आशीषं देहि मे सदा।
रेणुके मातृके तस्माद्
सर्वं हि वाञ्छितं मम।।6॥
हे रेणुकामाते, खरे तर एकमेव सारस्वरूप असा तुझा
आशीर्वाद सदैव मला दे. त्यामुळेच
सर्व इष्ट मला लाभेल.
जय श्रीकृष्ण!
No comments:
Post a Comment