Tuesday, April 27, 2021

कविचन्द्रहासविरचितं ॥सिंहस्थस्तवनम्॥

 

कविचन्द्रहासविरचितं ॥सिंहस्थस्तवनम्॥

हैन्दवाः मुदिताः सर्वे
सिंहस्थः पुण्यदो महान्।
नत्वा हरिहरौ स्नान्ति
गोदायाः क्षेत्रयोः जनाः॥1

सिंहस्थ मोठा पुण्यप्रद आहे. सर्व हिन्दुजन आनंदी आहेत. हरिहरांना नमस्कार करून गोदेच्या दोन क्षेत्री लोक स्नान करतात.

पुरारिश्च मुरारिश्च
निरामयत्वदौ खलु।
एष अवसरः प्राप्तुं
संकल्पदां कृपां तयोः॥2

भगवान शिव आणि भगवान विष्णु हे आम्हाला निरामयता प्रदान करणारे आहेत. संकल्प सिद्ध करणारी अशी त्यांची कृपा प्राप्त करण्याचा हा अवसर आहे.

सतामागमनं पुण्यं
वासः गोदातटे नृणाम्।
गौतम्या दर्शनं पुण्यं
स्नानं पुण्यं च पावकम्॥3

संताचे आगमन पुण्यवाचक तसेच गोदातटी माणसाचे राहणे पुण्यवाचक. गोदेचे दर्शन पुण्यवाचक. आणि स्नान पुण्यवाचक व पावन करणारे आहे.

सुजनो साधुतां यान्ति
चात्र स्मृत्वाऽमृतं खलु।
अभिषेकः सुधायाऽत्र
भक्तिरेव सुधा स्मृता॥4

येथे सज्जन अमृतस्मरण करून साधुत्वाला प्राप्त करतो. येथे सुधेचा म्हणजे अमृताचा अभिषेक केला जातो. भक्तिसच सुधा म्हटले जाते.

एषा धर्मसभा पूर्वा
शास्त्रचर्चा तथैव च।
अद्यापि धर्मचर्चा वै
भवेदत्र सुमङ्गला॥5

ही (पर्वणी) पूर्वी धर्मसंसद होती. तसेच मर्मचर्चा होती. आजही येथे पवित्र अशी धर्मचर्चा व्हावी.

अग्रेसरो भवेद् हिन्दुः
ज्ञानविज्ञानसंयुतः।
शुभदा केसरीकेतुः
विश्वेऽस्मिन् मण्डिता भवेत्॥6

ज्ञानविज्ञानसहित असा हिंदु अग्रेसर व्हावा. शुभदा अशी केसरी पताका या विश्वात डौलाने फडकावी.

अवर्षणं न जायेत
वृष्टिर्भवतु तुष्टिदा।
अकाले मा भवेत् वृष्टिस्
तु पर्याप्ताऽस्तु सा तथा॥7

दुष्काळ पडू नये. संतोषप्रद वृष्टी व्हावी. अकाली वृष्टी होवू नये. तर ती तशी पर्याप्त असावी.

वृद्धिर्भवतु शान्तिश्च
स्वस्तिर्भवतु हर्षदा।
परमोत्कर्षिणी गोदा
भवतु धनधान्यदा॥8

आनंददायी वृद्धी व्हावी. शान्ती असावी. कल्याण व्हावे. परम उत्कर्ष साधणारी गोदा धनधान्य देणारी होवो.

श्रीगोदां मातृकां नत्वा
प्रार्थये स्वस्तये च नः।
प्रसन्नाऽस्तु सदा माता
कृपाकरी भवेत् सदा॥9

श्रीगोदामाईला वंदन करून आमच्या कल्याणार्थ प्रार्थना करतो.    माता नेहमी प्रसन्न असावी तिने नेहमी कृपा करणारी व्हावे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...