Tuesday, April 27, 2021

दातृत्वं स्मर सत्वरम् ।।

 

दातृत्वं स्मर सत्वरम् ।।
-
चन्द्रहासः।

नयसि भास्करं कुत्र
कियद्वर्षसि मेघ रे।
नादं करोषि धीरं त्वं
गभीरं सकलं जगत्।।१।।

हे मेघा, किती वृष्टी करतोस? सूर्याला कोठे घेऊन जातोस? तू धीर असा नाद करतोस आणि सर्व जग गंभीर होते.

तडित्प्रभा कियच्च त्वत्
भीतं करोति मानवम्।
दृश्यतेऽदृश्यतेऽम्भोद
लीलानाटकमास्ति ते।।२।।

तुझ्या वीजेची प्रभा माणसाला किती भयभीत करते? ती दिसते आणि अदृश्य होते हे तुझे लीलानाटक आहे.

काले वर्षय माकाले
सस्यसमृद्धिहेतवे।
पयोद भयदो जातो
दातृत्वं स्मर सत्वरम्।।३।।

हे पयोद, धान्यसमृद्धीसाठी योग्य वेळी वर्षा कर. आज तू भयदायी झाला आहेस. तुझे दातृत्व तू लवकर आठव.

नेच्छन्तीह जनास्त्वां रे
प्रत्यायान्तमनाहुतम्।
वृष्ट्या सृष्टिं च कुर्वन्तं
गभीरामखिलामिमाम्।।४।।

या अखिल सृष्टीला आपल्या वृष्टीने गंभीर करणा-या, अनाहुत आणि फिरून आलेल्या तुला लोक इच्छित नाहीत.

सञ्जातो वृष्टिकालस्त्व-
दधुना मास्तु वर्षणम्।
भाव्यवर्षे समागच्छा-
षाढे त्वं समये सखा।।५।।

तुझा वर्षाकाल संपला आहे. आता वर्षाव नको. हे सखा, आगामी वर्षात आषाढमासी तू वेळेवर ये.

समावहन्तु नद्यश्च
भूमिर्भवतु सस्यदा।
देव्या खड्गमभिप्रेत
मित्येव तोयदेन्द्र वै।।६।।

नद्या प्रवाहित व्हाव्यात. भूमी धान्य देणारी व्हावी. हे मेघराज, चन्द्रहासाला असेच अभिप्रेत आहे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...