उपयुक्तमसत्यं च...
© चन्द्रहासः।
पर्याप्तं न हि सत्यं तु
तत्रोपयुक्तता
भवेत्।
उपयुक्तमसत्यं
च
जनेभ्यो
रोचते इह॥
केवळ सत्य
असून भागत नाही. तेथे उपयुक्तता असली पाहीजे. या जगात उपयुक्त असे असत्यही लोकांना
आवडते.
मा मुञ्च तथापि त्वं रे
यद् सत्यं
तद् कदाचन।
असत्ये च विनष्टे वै
स्थास्यते
सत्यमेव हि॥
तरीही तू
कधीही जे सत्य आहे; ते सोडू
नकोस. असत्य नष्ट झाल्यावर सत्यच टिकते.
सत्यं ज्ञातं जनैः सत्यं
ततस्तैः
पर्युपास्यते।
लोकाभिनियमो
मित्र
जयते
सत्यमेव हि॥
खरोखर लोक
सत्य जाणतात. नंतरच त्याची उपासना केली जाते. मित्रा, हा लोकनियम आहे की, सत्यच जिंकत असते.
© चन्द्रहासः।
No comments:
Post a Comment