Tuesday, April 27, 2021

उपचारचतुष्टयम्।

 

उपचारचतुष्टयम्।
©
डाॅ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर

सामो दानं च दण्डश्च
भेदोऽपि च तथैव च।
चतुष्टयस्य प्रयोगेन
सिद्धिः प्राप्या नृभिस्तथा॥1
साम, दान, दंड, भेद या चारांच्या एकत्रित प्रयोगाने माणसांनी सिद्धी प्राप्त करावी.

एकस्येव प्रयोगस्तु
हानिकरस्तथा भवेत्।
तत्वमेतन्न विस्मर्यं
कुत्रापि च कदापि च ॥2
केवल एकाचा प्रयोग हानिकारक होईल, हे तत्त्व कुठेही कधीही विसरू नये.

न सिद्धिः केवलं प्रेम्णा
न क्रोधेनापि केवलम्।
यथोचितेन मार्गेण
सिद्धिलाभो न संशयः॥3
केवल प्रेमाने वा केवल स्नेहाने नाही; तर यथोचित मार्गाने सिद्धी लाभते.

खड्गस्य प्रतिकाराय
खड्गमेव हि साधनम्।
राष्ट्रेण योजितव्यं वै
सामप्रयोजनं तत्र
तथा नार्हति नार्हति॥4
तलवारीच्या प्रतिकारासाठी तलवारच साधन म्हणून राष्ट्राने योजावे. तेथे चर्चेचे तसे प्रयोजन योग्य नाहीच नाही.

राष्ट्रनीतिरियं योज्या
समर्था त्रिषु कालेषु।
इतोऽपि किं च वक्तव्य
मितिहासोऽस्ति तथा॥5
तीनही कालात समर्थ अशी ही राष्ट्रनीति योजावी. अजून काय बोलावे; तसा इतिहास आहे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...