कविचन्द्रहासविरचित-
हर्षप्रसारकजनप्रशंसनम्।
केचन
मानवाः सत्यम्
उल्लसिता भवन्ति ते।
आनन्दः स्वयमायाति
यत्र यत्र प्रयान्ति ते॥
खरंच, काही माणसे उर्जावान किंवा उल्लासयुक्त असतात.
ते जेथे जेथे जातात; आनंद स्वतःहून तेथे तेथे येतो.
मन्ये दैवतलोका हि
स्वयं भूलोकमागत्य।
उपकुर्वन्ति सर्वान् च
प्रसार्य हर्षमेव वै॥
खरोखर देवता गणच पृथ्वीवर येऊन
हर्षोल्लासाचा प्रसार करून सर्वाना उपकृत करतात.
विजयः सुयशस्तेषां
च सर्वत्र भवेत् सदा।
कामयेऽहं कृते तेषां
प्रार्थये च सदा सदा॥
सर्वत्र त्यांचा विजय व्हावा, त्यांना
सदा सुयश असावे अशी मी इच्छा करतो व त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
No comments:
Post a Comment