Tuesday, April 27, 2021

ज्ञेयं मनः।

 

ज्ञेयं मनः।

चन्द्रहासविरचितं काव्यं
ज्ञेयं शूरेण वै मनः॥

धन्योऽस्ति मानवः स्वयं
मनो जानाति स्वस्य यः।
नेतरेषां मनो ज्ञातुं
दुर्गमं स्वस्य केवलम्॥
तो माणूस धन्य होय; जो स्वतः चे मन जाणतो. इतरांचे मन जाणणे कठीण नाही. केवळ स्वतः चे मन जाणणे कठीण आहे.

तस्मादेव जितं येन
मनःस्वस्य सुदुर्लभः।
कथं न कठिणं जेतुं
ज्ञायते नैव यन्मनः॥
त्यामुळेच स्वतःचे मन जिंकणारा माणूस फार दुर्मीळ आहे. जे मन जाणलेच जात नाही, ते जिंकण्यास अवघड कसे बरे असणार नाही?

तस्माद् मित्र त्वया यत्नः
ज्ञातुं हि क्रीयतां मनः।
स एव पुरुषार्थो वै
ज्ञेयं शूरेण वै मनः॥
म्हणून मित्रा, मन जाणण्यासाठी तू प्रयत्न करावास. तोच पराक्रम आहे. खरोखर मन हे शूराकडूनच जाणले जाऊ शकते.

© डाॅ. चंद्रहासशास्त्री सोनपेठकर

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...