Tuesday, April 27, 2021

नेत्रे द्वे चापि कर्णौ द्वौ।

 

नेत्रे द्वे चापि कर्णौ द्वौ।
©
चन्द्रहासः।

नेत्रे द्वे चापि कर्णौ द्वौ
मस्तिष्कं त्वेकमेव हि।
परं चिनोति तद् कुत्र
विश्वसेद् मानवः खलु॥
माणसाला डोळे दोन असतात आणि कानही दोन असतात. मस्तिष्क मात्र एकच असते. पण मानवाने कोठे (कानांवर की डोळ्यांवर) विश्वास ठेवावा; हे मात्र तेच निश्चित करते.

नेत्रे द्वे चापि कर्णौ द्वौ
प्रकृत्या रचना परा।
जयो तु जायते तस्य
यो विश्वसति नेत्रयोः।।
ही प्रकृतीची उत्तम रचना आहे की, डोळे दोन आहेत आणि कानही दोन दोन आहेत. जो डोळ्यांवर विश्वास ठेवतो; त्याचाच जय होतो.

भ्रमो तु नेत्रयोः शक्यं
तौलनं कर्णनेत्रयोः।
कृत्वा हि निर्णयः कार्यः
परिणामे सुखावहः।।
डोळ्यांचाही भ्रम होऊ शकतो. तेव्हा कान आणि डोळे यांची तुलना करून निर्णय करावा. असा निर्णय परिणामी सुखावह असतो.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...