Tuesday, April 27, 2021

किं कथं सुन्दरम्।

 

किं कथं सुन्दरम्।
काय कसे सुन्दर आहे?
रचना - चन्द्रहासः।

किमिति सुन्दरं सुहृद्
कथं च सुन्दरं वद।
तदेव सुन्दरं मित्र
तदेव सुन्दरं सदा॥ धृ.॥

सुन्दरं जीवनं तावत्
यावन्मनोऽपि सुन्दरम्।
सुन्दरं च जगत् सर्वं
यावद्दृष्टिश्च सुन्दरी॥1

मन सुन्दर असेपर्यंत जीवन सुंदर आहे. आणि दृष्टी सुंदर असे पर्यंत सर्व जग सुन्दर आहे.

सुन्दरसमयस्तावत्
यावन्मधूरनिष्क्रमः।
सुन्दरं हि मुखं तावत्
हास्येन लसितं हि तत्॥2

वचन सुन्दर असेपर्यंत काळ सुन्दर आहे. मुख हास्ययुक्त असेपर्यंत सुन्दर आहे.

सख्यं तु सुन्दरं तावत्
याचनया विना हि तत्।
किमिति सुन्दरं पृष्टं
यद् यद् हर्षप्रदायकम्॥3

याचनेशिवाय असेपर्यंत मैत्री सुन्दर आहे. सुन्दर म्हणजे नेमके काय असे विचारले, तर जे जे आनंद देणारे; ते ते सुन्दर होय.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...