सदा सदा सदा सदा॥
रचना- चन्द्रहास दु. सोनपेठकर
विस्मरेयं न पादौ ते
क्षणमेकं
हि रेणुके।
सुखे भवतु
ते दृष्टिः
ममोपरि च
मातृके॥1॥
हे रेणुके, एक क्षण ही मी तुझ्या चरणांना विसरू नये.
हे माते, सुखात (मी
सुखात असताना) तुझी दृष्टी माझ्यावर ठेव.
अल्पे प्राप्ते सुखेऽपि त्वां
विस्मरिष्यामि
मे भयम्।
अभयदायिनी
साक्षात्
दूरीकुरुष्व
मे भयम्॥2॥
अल्प ही
सुख लाभले असता तुला विसरेन असे भय मला वाटते. तू साक्षाद् अभयदायिनी आहेस. माझे
भय दूर कर.
दुःखादपि सुखे मातस्
स्मरणमधिकं
भवेत्।
कृपाफलं
हि ते मत्वा
भोज्यं
मया सुखं सदा॥3॥
हे माते, दुःखापेक्षाही सुखात (तुझे) स्मरण अधिक
व्हावे. मी सदैव तुझे कृपाफल मानून सुख आस्वादावे.
सत्यं तदेव विश्वाम्बे
न हि सुखं
विना कृपाम्।
इच्छाम्यहं
कृपायै ते
सदा सदा
सदा सदा॥4॥
हे जगदंबे, तेच सत्य आहे की, कृपेविना सुख नाहीच. मी नेहमी तुझ्या
कृपा इच्छितो.
तस्मात्त्वं हि कृपां कृत्वा
स्मारय
नाम ते मया।
तस्माद्
सिद्धाश्चतुवर्गा
भवन्ति
नात्र संशयः॥5॥
म्हणून
तूच कृपा करून तुझे नाम माझेकडून स्मरवून घे. त्यामुळे चारही पुरुषार्थ सफल होतील, यात शंका नाही.
उत्तमम्!
ReplyDelete