Tuesday, April 27, 2021

कविचन्द्रहासरचित- ॥कर्मप्रशंसनम्॥

 

कविचन्द्रहासरचित-
॥कर्मप्रशंसनम्॥

सौकर्येण हि यद् प्राप्तं
तद् कर्मणेति भण्यते।
कठिणे निन्द्यते भाग्यं
येन सः जयते न वै॥1
जो सुलभतेने जे प्राप्त झाले, ते कर्मामुळे झाले; असे म्हणतो आणि कठिण जात असता भाग्याला दोष देतो, तो विजयी होऊ शकत नाही.

भाग्यं तु तमसाच्छन्नं
कर्मणा तद् प्रकाश्यते।
सूर्याभावे तु किं कार्यं
कमलस्य सरोवरे॥2
भाग्य हे अंधःकाराने झाकलेले असते. ते कर्माने प्रकाशित होते. सूर्याच्या अभावी सरोवरातील( सूर्यविकासी ) कमलाचे काय काम?

भाग्यं तु जडवत् मन्ये
सुस्थिरं तद् तथैव हि।
कर्मप्रधानलोकोऽयं
वीरा भोग्या वसुन्धरा॥3
भाग्य हे जडासारखे वाटते. ते तसेच राहते. हे जग मात्र कर्मप्रधान आहे. वीराने राज्य भोगावे. ( असे वचन आहे. )

कर्मण्येवाधिकारस्ते
भगवान्नप्युवाच तद्।
विस्मृत्य वचनं तस्य
जनाः स्मरन्ति तं कथम्॥4
तुझा केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे; असे भगवंतांनीही म्हटले आहे. त्याचे वचन विसरून लोक त्याला कसे आठवतात?

उपदेशमनुसृत्य
वर्तनं दुष्करं तथा।
उपदेशं तु विस्मृत्य
वर्तनं सुकरं तथा॥5
उपदेशानुसार तसे वागणे कठिण आणि उपदेश विसरून वर्तन करणे तसे सोपे असते.

नासाध्यं यत्नशीलाय
किं साध्यमितराय च।
तेनाऽवलम्ब्यते भाग्यं
हितं स्थास्यति कर्मणि ॥6
प्रयत्नशील माणसाला काही असाध्य नाही. आणि प्रयत्नशील नसणारास काय साध्य आहे? तो भाग्यावर अवलंबून राहतो आणि हित कर्मात वसते.

यन्नजानामि तद् किं वा
सुपरिवर्तितं भवेत्।
यद् ज्ञातुं शक्यते तत्तु
सुपरिवर्तितं भवेत्॥7
जे मी जाणत नाही, ते बदलणे सोपे कसे होईल? जे मी जाणतो, ते मात्र बदलणे सोपे होईल.

तस्माद् मित्र त्वया कर्म
स्वाराध्यं हि सदा सदा।
प्रणम्य भगवत्पादौ
वाचमनुचरन् तथा॥8
म्हणून मित्रा तू भगवंताच्या चरणी प्रणाम करून व त्यांच्या वाणीचे अनुकरण करून कर्माचे चांगल्या प्रकारे आराधन म्हणजे आचरण करावेस.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...