हे चन्द्रेश, ....!
© चन्द्रहासः।
हे चन्द्रेश नमस्तुभ्यं
रोहिणीसहिताय च।
पार्वतीपसमीपस्थ
स्वीकुरू मे नमस्कृतिम्॥1॥
रोहिणी सोबत असणाऱ्या
पार्वतीपतीच्या म्हणजे भगवन शंकराच्या जवळ राहणाऱ्या हे चंद्रा, ईश्वरा, माझा नमस्कार स्वीकार कर.
शशिन् शैत्यं तु संसिद्धं
सुखदं मेऽस्तु तद् सदा।
शिवसंकल्पयुक्तं मे
मनः कार्यं त्वयाऽधुना॥2॥
हे चंद्रा, तुझी शीतलता प्रसिद्ध आहे. सुखद अशी
ती शीतलता मला असावी. तसेच तू आता माझे मन चांगल्या पवित्र संकल्पानी युक्त
करावेस.
आह्लादं विजयं देहि
यशः प्रेयः सुधाकर।
माधुर्यं च रमाबन्धो
देयं त्वयाऽधुना हि नः॥3॥
हे सुधाकर, आह्लाद, विजय, यश, प्रिय दे. हे लक्ष्मीमातेच्या बंधो, आता तू माधुर्य आम्हास द्यावेस.
कुशलं वद तान् त्वं मे
ये ये जना हितैषिणः।
अर्धरात्रौ यदा ते त्वां
नमन्ति श्रद्धया तदा॥4॥
जे जे माझे हित इच्छिणारे
लोक आहेत, ते अर्धरात्री जेव्हा
श्रद्धेने तुला नमस्कार करतील, तेव्हा त्यांना तू माझे
कुशल संग.
तस्माद् दुग्धस्य
माधुर्यं
वर्धतेऽत्र न संशयः।
कृतार्थोऽस्मि सुधांशो रे
मित्र तेऽहं सदा सदा॥
त्यामुळे त्यांच्या
दुधाचे माधुर्य वाढेल यात संशय नाही. हे सुधांशो, मित्रा, मी तुझा सदैव आभारी आहे.
जय श्रीकृष्ण!!!
No comments:
Post a Comment