Tuesday, April 27, 2021

चन्द्रहासविरचितं काव्यकुसुमं ॥सम्पदाऽयाति शाश्वती॥

 

चन्द्रहासविरचितं काव्यकुसुमं
॥सम्पदाऽयाति शाश्वती॥

स्वच्छशुद्धपवित्राणां
नार्थः समो हि भावयेत्।
उत्तमोत्तमसोपानं
मत्वा व्यवहरेत् तथा॥1

स्वच्छ शुद्ध आणि पवित्र यांच्या समान अर्थाची कल्पना करू नये. या चढत्या क्रमाने उत्तमोत्तम पाय-या आहेत; असे समजून व्यवहार करावा.

मार्जकेण भवेत् स्वच्छं
शुद्धं तु क्रीयतेऽग्निना।
पवित्रं प्रोक्षणात् भवेत्
मनः स्वर्णं गृहं तथा॥2

घर झाडूने मन दुर्विचार मिटवून व सोने ब्रशने स्वच्छ होते. मन ज्ञानाच्या अग्नीने, सोने तापवून  भेसळ दूर करून व घर दिवा लावून शुद्ध केले जाते. मन सुविचारांचे, घर सडासंमार्जनाचे; व सोने रिठ्याचे/ कावेचे पाणी शिंपडून पवित्र होते.

चित्ते हि पवित्रे जाते
तथैव सदनं भवेत्।
पवित्रे सदने स्वयं
सम्पदाऽयाति शाश्वती॥3

चित्त पवित्र झाले, तर घर तसेच म्हणजे पवित्र होईल. आणि अशा पवित्र घरात  शाश्वत सम्पदा स्वतःहून येते.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...