Tuesday, April 27, 2021

व्यक्तमव्यक्तम् |

 

व्यक्तादव्यक्तमास्ते वैश्रेष्ठं सूक्ष्मतरं तथा |

तस्यानावरणं मित्र परिणामो हि केवलम् || ||

 

व्यक्तापेक्षा अव्यक्त हे श्रेष्ठ आणि अधिक सूक्ष्म  असते.  मित्रा, त्याचे अनावरण म्हणजे केवळ परिणाम होय.

 

तस्मात् द्वौ स्नेहकोपौ तौ न वक्तव्यौ कदाचन |

परिणामो भवेत् तयोःप्रकर्षेण सहात्र वै || ||

 

म्हणून  स्नेह आणि राग कधीही  व्यक्त करू नये. येथे म्हणजे या जगात त्या दोघांचाही परिणाम प्रकर्षाने झाला पाहिजे. 

 

प्राकट्येन तु नष्टः सःभवति निश्चयेन हि |

कोपो भवति शान्तश्चप्रकटीकृत्य सर्वथा || ||

राग प्रकट केल्याने तो नक्कीच नाहीसा होतो. कारण प्रकट केल्याने राग सर्वथा शांत होतो.

 

संज्ञानविषयः स्नेहःज्ञायते नोच्यते किल |

आवश्यकी यदुक्तिश्चेत्न प्रीतिः सफला च सा || ||

स्नेह हा समजून घेण्याचा विषय आहे. बोलण्याचा नहीं. बोलावे लागते, तेथे प्रीति नसते.

 

अव्यक्तमेव तस्सर्वंयद् यद् दिव्यमभौतिकम् |

अर्हमनुभवार्थं यन्नैव प्रकटनाय च || ||

जे जे अभौतिक आणि दिव्य आहे, ते ते सर्व अव्यक्त आहे. ते अनुभविता येते, प्रकट करता येत नाही.

 

प्रदर्शनाय भाषितुं वा नास्ति तच्च कदाचन |

दृष्टेश्च नेत्रयोर्वासो दिव्यतां ज्ञायतां तथा || 

ते प्रदर्शन करण्यासाठी नाही. बोलण्यासाठी नाही. जय प्रमाणे डोळ्यांची दृस्टि दिसत नाही, डोले दिसतात; तसे दिव्यतेला जाणावे. 

 

जय श्रीकृष्ण!!!

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...