शुभमैत्रदिनम्।
© चन्द्रहासः।
मित्रत्वं वद सत्य
किं
संपृष्टे सति मां श्रुणु।
साख्यं प्राकृतिकं मन्ये
कृत्रिमता न विद्यते॥
मित्रत्व म्हणजे
नेमकं काय, असं मला विचारलं असता ऐका. मैत्री
नैसर्गिक असते. तेथे कृत्रिमता नसते.
आह्वानाद्धि च
पूर्वं वै
स्थितो भवति तत्परः।
अतुल्यं तस्य सामर्थ्यं
संमील्य त्रायते खलु॥
मित्र हाक
देण्याच्या पूर्वी सहाय्याला तत्पर असतो. त्याचे सामर्थ्य अतुल्य असते. तो भेटून
तारतो. (तरून नेतो)
निरागसतया वृद्धिं
सिद्धिमायाति खलु।
साख्यभावो हि दिव्यं वै
विजयते सदा सदा॥
खरोखर, मैत्री निरागसपणे वृद्धीस सिद्धीस
येते. ती दिव्य असते. तिचा सतत सतत विजय होतो.
जय श्रीकृष्ण!
No comments:
Post a Comment