Tuesday, April 27, 2021

शुभं तत्तव दर्शनम्।

 

शुभं तत्तव दर्शनम्।

© चन्द्रहासः।

 

शूलं शूलं हि दर्शनं
दुर्जनस्य कृते तव।
महाकाल्यम्बिके शिवे
नमस्तुभ्यं नमो नमः॥

हे महाकालीमाते, शिवे, दुर्जनासाठी तुझे दर्शन शूलासारखे आहे. शूलच आहे. तुला वारंवार नमस्कार असो.

 

स्वस्तिकं स्वस्तिकं शुभं
भक्ताय तव दर्शनम्।
महाकाल्यम्बिके शिवे
नमस्तुभ्यं नमो नमः॥

हे महाकालीमाते, शिवे, भक्तासाठी तुझे दर्शन अतिशय कल्याणकारी आणि शुभ आहे. तुला वारंवार नमस्कार असो.

 

शुभं शुभं शुभं शुभं
भक्ताय तव दर्शनम्।
महालक्ष्म्यम्बिके रमे
नमस्तुभ्यं नमो नमः॥

हे महालक्ष्मीमाते, रमे, भक्तासाठी तुझे दर्शन अत्यंत शुभ आहे. तुला वारंवार नमस्कार असो.

 

लाभदं लाभदं शुभं
भक्ताय तव दर्शनम्।
महालक्ष्म्यम्बिके रमे
नमस्तुभ्यं नमो नमः॥

हे महालक्ष्मीमाते, रमे, भक्तासाठी तुझे दर्शन अत्यंत लाभप्रद आणि शुभ आहे. तुला वारंवार नमस्कार असो.

 

शुभ्रं शुभ्रं शुभं शुभं 

छात्राय तव दर्शनम्।
सरस्वत्यम्बिके शुभे
नमस्तुभ्यं नमो नमः॥

हे सरस्वतीमाते, शुभे, विद्यार्थ्यासाठी अतिशय शुभ्र असे तुझे दर्शन शुभ आहे. तुला वारंवार नमस्कार असो.

 

शुभदं शुभदं शुभं
भक्ताय तव दर्शनम्।
सरस्वत्यम्बिके शुभे
नमस्तुभ्यं नमो नमः॥

हे सरस्वतीमाते, शुभे, भक्तासाठी तुझे दर्शन शुभ आहे. शुभप्रद आहे. तुला वारंवार नमस्कार असो.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...