द्वौ ध्रुवौ।
© चन्द्रहासः।
विस्मरणीयमेकं च
स्मरणीयं तथापरम्।
एतयोर्ध्रुवयोर्मध्ये
जीवति जीवनं नरः॥1॥
विस्मरणीय आणि स्मरणीय या
दोन ध्रुवांमध्ये माणूस जीवन जगत असतो.
संख्यारेखैव भातीति
जीवनं मानुषं किल।
यः ध्रुवान्वयनं सम्यक्
कृत्वा जीवति जीवति ॥2॥
खरोखर माणसाचे जीवन
संख्यारेषेप्रमाणे भासते; नाही का? जो या ध्रुवांचे समन्वयन करून जगतो; तोच ख-या अर्थाने जगतो.
देहो विस्मरणीयोऽयम्
आत्मा स्मरणीयः सदा।
दुःखं विस्मृत्य च स्मृत्वा
सुखं भवे भवेत् सुखी॥3॥
अध्यात्मात नेहमी देह
विसरून आत्मा लक्षात ठेवावा. संसारात दुःख विसरून आणि सुख स्मरून सुखी व्हावे.
समन्वयेन चैतेन
चित्तं हृष्टं हि जायते।
हृष्टे चित्ते वद त्वं रे
किं न तद् प्राप्यते नृणा॥4॥
अशा समन्वयाने चित्त प्रसन्न होते. चित्त प्रसन्न झाले असता
तू सांग, काय बरं ते प्राप्त होणार
नाही?
प्राप्तव्यमिति तत् तत्र
नैवावशिष्यते पुनः।
सफलं हर्षदं सर्वं
संजायते न संशयः॥5॥
प्राप्तव्य असे ते तेथे
पुन्हा उरतच नाही. सर्व काही सफल आणि मोदप्रद होते, यात संशय नाही.
जय श्रीकृष्ण!!!
No comments:
Post a Comment