सुखमिति किम्?
© डा. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर
आगत्य मत्समीपे च
पृष्टवान् किं सुखं वद।
वयस्योऽस्ति प्रियोऽयं मे
बाल्यादारभ्य चोत्तमः॥0॥
बालपणापासून प्रिय आणि उत्तम असा हा
माझा मित्र आहे. त्याने माझ्याजवळ येऊन विचारले की, सुख म्हणजे काय ते सांग.
न ब्रुयात् नेति मे नीतिः
प्रायः संपाल्यते मया।
उत्साहेन प्रवक्तुं तम्
अहमुद्युक्तवान् खलु॥0॥
नाही असे म्हणू नये अशा माझ्या
धोरणाचे सहसा माझेकडून पालन होते. त्याला उत्साहाने सांगण्यास मी उद्युक्त झालो.
सोऽप्येकाग्रेन चित्तेन
श्रोतुमुत्साहितस्तदा।
इयं तस्यैव जिज्ञासा
मां प्रेरयति भाषितुम्॥0॥
तेव्हा तो देखील एकाग्र चित्ताने
ऐकण्यास उत्सुक झाला. ही त्याची जिज्ञासाच मला बोलण्यास प्रेरित करते.
अर्धोन्मीलितनेत्रोऽहं
वक्तुं प्रारब्धवान् ततः।
शृणु मित्र सुखस्येतं
वृत्तान्तं त्वां ब्रवीम्यहम्॥0॥
मी अर्धवट डोळे मिटून तेव्हा बोलण्यास
प्रारंभ केला. ऐक मित्रा, तुला सुखाचा हा वृत्तान्त
मी सांगतो.
द्विविधमस्ति सुखं मित्र
भौतिकं पारमार्थिकम्।
द्वयोरपि वरिष्ठत्वं
वर्तते नात्र संशयः॥0॥
मित्रा, सुख दोन प्रकारचे आहे.
भौतिक आणि पारमार्थिक. दोहोंचेही श्रैष्ठत्व निःसंशय आहे.
सुखं तद् येन लब्ध्वा हि
दुःखं न स्मर्यते जनैः।
बिन्दुमात्रस्मृतिस्तस्य
दुःखस्य नैव वर्तते॥1॥
ते सुख ज्याची प्राप्ती करून लोकाना
दुःखाची आठवण राहत नाही, त्या दुःखाची
बिन्दुइतकीही आठवण असत नाही;
मानवदेवदैवेभ्यो
भुक्तं यच्च पुरा किल।
तस्य दुःखस्य विस्मृतिर्
जायते येन तद्सुखम्॥2॥
मानव, देव आणि नशीबापासून जे
पूर्वी भोगले; त्या दुःखाची विस्मृती
ज्याने होते; ते सुख
अभावस्तमसो यो सः
प्रकाश इति दर्श्यते।
दुःखाभावो तथा ह्यत्र
सुखशब्देन कथ्यते॥3॥
अंधाराचा जो अभाव तो प्रकाश म्हणून
दाखविला जातो तसे दुःखाचा अभावच येथे
सुखशब्दाने सांगीतला जातो.
आत्यन्तिकोऽस्तु दुःखस्य
चाभावस्तर्हि एव वै।
तद्सुखं सत् सुखं मत्वा
भवे व्यवहरेत् सदा॥4॥
आणि खरोखर दुःखाचा आत्यंतिक अभाव असला
पाहीजे. तेच खरे सुख मानून संसारात व्यवहार करावा.
अतो यत्नस्तु नः प्राप्तुं
सुखं यद् शाश्वतं परम्।
तस्मादन्यत् सुखं यद्धि
छाया हि केवलं मतिः॥5॥
म्हणून शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी
आमचा प्रयत्न असावा. त्याहून अन्य जे सुख ते केवल सावली सारखे असेच मत आहे.
छायायां विगतायां तु
दुःखमेव विवर्धते।
परमं तु सुखं प्राप्य
सुखमेव हि केवलम्॥6॥
छाया गेल्यानंतर दु:खच वाढते. परम असे
सुख मिळाल्यानंतरच फक्त सुखच राह्ते.
भवसुखमनुसृत्य
तत्रैका मुख्यधारणा।
यद् यच्च दीयतेऽस्माभिः
तद् तच्च प्राप्यते खलु॥7॥
संसारातील सुखाबाबत एक मुख्य धारणा
आहे की, जे जे आम्ही देतो ते ते
आम्ही खरोखर प्राप्त करतो.
सुखं दत्वा सुखं प्राप्यं
सुलभो नियमोऽस्त्ययं।
एनं विस्मृत्य लोकास्तु
दूषयन्ति भवं खलु॥8॥
सुख देऊन सुख घ्यावे. हा सोपा नियम
आहे. याला विसरून लोक संसाराला दोष देतात.
सौजन्ये पीडिते जाते
दुर्व्यवहारकारणात्।
प्रतिकारो हि मार्गोऽयं
युक्तो मत्वाऽचरेत्तथा॥9॥
मात्र कोणाच्या वाईट वागण्याने सौजन्याची ऐशी तैशी झाली तर प्रतिकार
हाच मार्ग समजून तसे आचरण करावे.
दुर्जनैः सह सौजन्यं
निजक्लेशस्य कारकम्।
न तत्रापक्रमो कार्यः
कदाचन कदाचन॥10॥
दुर्जनासोबत सौजन्य हे स्वत: ला क्लेश
देणारे असते. कधीही कधीही त्यात अपक्रम करू नये.
परमार्थात् तु भिन्ना हि
नियमाः सन्ति वै भवे।
स्वे स्वे स्थाने हि ते युक्ता
मत्वा व्यवहरेत् सदा॥11॥
परमार्थापेक्षा वेगळे नियम संसारात
असतात. ते आपापल्या जागीच योग्य असतात असे समजून व्यवहार करावा.
एकं तु परमं स्वस्य
कृते मान्यं सुखं खलु।
अन्यच्च सहकारिणां
कृते सुखं महद् किल॥12॥
एक स्वत:चे परम सुख असते तर दुसरे
सहकारी लोकांचेही सुख असते
यावज्जीवेत् सुखं जीवेत्
मन्त्रो वृथा भवेन्न हि।
भौतिके भौतिका मार्गाः
युक्ताः स्मृताः सदा सदा॥13॥
जोपर्यंत जगेल सुखाने जगावे हा मंत्र
व्यर्थ जाऊ देऊ नये. भौतिक सुखासाठी भौतिक मार्ग नेहमी योग्यच आहेत.
यथा खड्गेन खड्गस्य
यथा हि गदया गदा।
प्रतिकारस्तु कर्तव्यस्
तथा तथा तथा तथा॥14॥
जसे तलवारीने तलवारीचा, गदेने गदेचा तसाच प्रतिकार करावा.
समाप्ते जीवने मित्र
वद पारमार्थिकं सुखम्।
प्राप्तुं शक्यं कुतः सत्यं
नैव नैव च नैव च॥15॥
जीवनच समाप्त झाले तर मित्रा सांग
पारमार्थिक सुख तरी कोठून प्राप्त करणार? खरोखर ते शक्य नाही नाही
नाही.
मतिस्तु मे बलं चापि
धनं यशस्तथैव च।
तपोऽस्तु मे, न तापोऽस्तु
ज्ञानं पीडाफलं न हि॥16॥
बल धन तसेच यश आणि तप माझे असावे .
ताप नसावा. ज्ञान हे पीडेचे फळ नसते.
भवे भवसुखं वर्यं
तदर्थं शरणं न च।
संघर्षो हि मार्गमेकम्
आचरेत् मानुषः स्वयम्॥17॥
संसारात भौतिक सुख निवडावे पण त्यसाठी
कोन माणसाला शरण जाऊ नये. मनुष्याने स्वत: संघर्ष करण्याचा मार्ग निवडावा.
मुर्खता दीनता त्याज्या
त्याज्यातिलीनता तथा।
अन्यथा नावशिष्ट्यानि
स्वायुर्धर्मसुखानि च ॥18॥
मूर्खपणा, दीनता आणि अति लीनता सोडावी. नाही तर
स्वत:चे आयुष्य, धर्म, सुख उरत नाही.
नाचरेत्तु समानं हि
दुर्जनसज्जनैः सह।
तत्र भेदो हि कर्तव्यः
परिणामे सुखावहः॥19॥
दुर्जन आणि सज्जनासोबत सारखेच वागू
नये. तेथे भेद करणे हेच अंती सुखावह असते.
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना
नीतिमपि तथाऽचरेत्।
तस्मादेव सुखप्राप्तिर्
वर्तमानभविष्ययोः॥20॥
जर व्यक्ती व्यक्ती मध्ये बुद्धी
वेगळी असेल तर तशीच भिन्न भिन्न नीती आचरावी. त्यामुळेच वर्तमान आणि भविष्यात सुख
प्राप्त होऊ शकते.
कामयेऽहं सुखं सर्वं
सर्वेषामपि शारदे।
भगवति नमस्तुभ्यं
नो मनोरथपूर्तये॥21॥
हे शारदे, मी सर्वांच्या साठी सर्व सुखाची इच्छा करतो. आमच्या मनोरथ
पूर्तीसाठी हे भगवती, तुला नमस्कार असो.
जय श्रीकृष्ण!!!
No comments:
Post a Comment