वन्देऽहं कालिदासम्।
© चन्द्रहासः।
( प्रा. डॉ. धामणे सर व प्रा. थिगळे सर यांनी महाकवि कालिदासा वरील लेखावर प्रतिक्रिया नोंदवली. शाबासकी दिली. मित्रवर्य, संप्रेरक अशा या दोहोंना ही रचना समर्पित करताना आनंद होत आहे.)
जीवनं कालिदासं तत्
विहाय कल्पये कथम्।
साहित्यमखिलं तस्य
जीवनमार्गदर्शनम् ॥1॥
कालिदासाविना जीवनाची कल्पना कशी
करावी? त्याचे सर्व साहित्य जीवनात
मार्गदर्शन करते.
प्रतिभा तस्य सिञ्चन्ती
सुधाकणान् पुनः पुनः।
साहित्यमखिलं तस्य
संजीवनं हृदि स्थितम् ॥2॥
त्याची प्रतिभा अमृतकण शिंपडते.
त्याचे साहित्य ह्रदयातील संजीवन आहे.
वन्देऽहं कालिदासं तं
कविकुलगुरुं सदा।
संस्कृतगगने येन
व्याप्तं चराचरं तथा ॥3॥
अशा त्या कविकुलगुरु कालिदासाला मी
वंदन करतो, ज्याने संस्कृताकाशातील
चराचर व्यापले आहे.
जय श्रीकृष्ण।।
No comments:
Post a Comment