राष्ट्रं मे
वर्धतां नित्यं
भवेद् विकसितं तथा।
भारतमातरं वन्दे
पूज्यां वन्द्यां सदा सदा॥
माझे राष्ट्र नित्य वृद्धिंगत व्हावे. सदैव पूज्य वंदनीय अशा भारतमातेला मी
वंदन करतो.
प्राचीनं वैभवं
सर्वं
भगं यशः श्रियस्तथा।
स्वस्तिमृद्धिं तथा पुष्टिम्
लभेमहि वयं पुनः॥
प्राचीन वैभव ऐश्वर्य यश लक्ष्मी
समृद्धी शक्ती कल्याण आम्ही पुनः प्राप्त
करू.
आसीदिह यथापूर्वं
शास्त्रचर्चा तथा भवेत्।
अनुक्रिया तु संस्कार्या
शूरवीरविजेतृणाम्॥
पूर्वी प्रमाणे येथे शास्त्र चर्चा
व्हावी. शूर वीर विजेत्यांच्या अनुकरणाचे संस्कार व्हावेत.
विश्वगुरुपदं
ध्येयम्
ऐक्यमेव हि साधनम्।
भारतभूमिका वन्द्या
विनायकेन मन्त्रिता॥
विश्वगुरु पद हे आमचे ध्येय आहे. ऐक्य हे साधन आहे. स्वा. सावरकरांनी सांगितलेली
भारतभूमिका वंदनीय आहे.
नमति चन्द्रहासोऽयं
वन्द्यां भारतमातरम् ॥
अशा वंदनीय भारतमातेला हा चन्द्रहास
नमस्कार करतो.
© डाॅ. चन्द्रहास शास्त्री
No comments:
Post a Comment