Tuesday, April 27, 2021

स्वप रे सत्वरं त्वरम्।।

 

स्वप रे सत्वरं त्वरम्।।
©
चन्द्रहासः।

मदीयं शावकं त्वं रे
प्रियं च वल्लभं च मे।
जीवनं दर्पणं मे त्वं
स्वप रे सत्वरं त्वरम्।।1

माझ्या छाव्या, प्रिया, लाडक्या, तू माझे जीवन आहेस, आरसा आहेस. तू आता लवकर झोप.

रात्र्यधुना च संजाता
शान्ता सृष्टिरियं खलु।
रवो न श्रूयते कस्य
स्वप रे सत्वरं त्वरम्।।2

आता रात्र झाली, सृष्टी शान्त झाली. कोणाचा आवाज ऐकू येत नाही. तू आता लवकर झोप.

मित्रेण प्रेषितः चन्द्रः
तारकाश्च लसन्ति नु।
सुरम्यं गगनं दृष्ट्वा
स्वप रे सत्वरं त्वरम्।।3

सूर्याने पाठविलेला चंद्र आणि तारका आकाशात शोभून दिसत आहेत. तू आकाश पहा. आणि लवकर झोप.

सुन्दरं पश्य निद्रायां
स्वप्नं सुखस्य बाल रे।
उत्तिष्ठ प्रप्रभाते त्वं
स्वप रे सत्वरं त्वरम्।।4

बाळा, तू झोपेत सुखाचे सुंदर स्वप्न पहा. सकाळी लवकर ऊठ. तू आता लवकर झोप.

आशीषो मे सदा तुभ्यं
भवेत् सर्वं सुमङ्गलम्।
सुखमस्तु सदा ते वै
स्वप रे सत्वरं त्वरम्।।5

माझा तुझ्यासाठी नेहमी आशीर्वाद आहे की, तुझे सर्व काही मंगल व्हावे. तू नेहमी सुखी असावेस. तू आता लवकर झोप.

आयाम्यहं च ते स्वप्ने
सुखस्यादाय पात्रकम्।
आयुष्मान् भव बाल त्वं
स्वप रे सत्वरं त्वरम्।।6

तुझ्या स्वप्नात मी सुखाने भरलेले भांडे घेऊन येते. बाळा, तू आयुष्मान् हो. तू आता लवकर झोप.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...