Tuesday, April 27, 2021

Sanskrit is my heart!

 

कोणी म्हणतं अमूक एक गोष्ट म्हणजे माझं लाईफ आहे. पण लक्षात ठेवा, लाईफ संपतं. हृदय संपत नाही. मनो हि जन्मान्तरसड़्गतिज्ञम् ! अर्थात मन हे जन्मोजन्मी आपल्या सोबत असतं. आणि त्याला जन्मोजन्मीचे आपले सोबती माहित असतात. त्यामुळे मन ही संज्ञा जीवनाहून व्यापक आहे.
"And so it is my stand that Sanskrit is my heart!"
संस्कृतनं जे दिलंय, ते कधीही न संपणारं दिलंय. आणि मुख्य म्हणजे संस्कृतनं खूप छान माणसांना आपल्यासोबत जोडलंय. संस्कृतविषयीची कृतज्ञता जन्मजन्मांतरी सोबत राहणार असेल, तर मुक्ती किंवा मोक्ष तरी कशाला हवा. पुनःपुन्हा जन्माला येऊ. संस्कृतशारदेची सेवा करू. होय! एक दिवस ती मयुरवाहना सरस्वतीमाता नक्कीच दर्शन देईल. एका जन्मतः मुक्या असणार्‍या बालकास तिने वाचा दिली; तर दर्शन नक्कीच देईल. आणि म्हणून शुभेच्छा हव्यात, ते संस्कृतकार्यासाठी! त्या आपण दिल्यात. मनःपूर्वक धन्यवाद! जय श्रीकृष्ण!!!

 चन्द्रहास:l

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...